दैनिक स्थैर्य । दि. २६ ऑगस्ट २०२२ । सातारा । वनविभाग व आरोग्य विभागात नोकरी लावतो असे अमिष दाखवून सातारा व मुंबई येथील पाच जणांची 11 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी राजेश नंदकुमार शिंदे, रा. बोरगाव, ता. सातारा याच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, वन विभागात वनपाल तर आरोग्य विभागात क्लार्क या पदावर नोकरी लावतो असे आमिष दाखवून राजेश नंदकुमार शिंदे याने दि. 7 जानेवारी 2021 ते 31 मार्च 2021 या कालावधीत गणेश कृष्णा चव्हाण, रा. सदरबझार, सातारा, सचिन दगडू कदम रा. घाटकोपर, मुंबई, सागर संतोष उत्तेकर रा. कांदिवली मुंबई, किरण प्रकाश शिंदे रा. गडकर आळी, सातारा या पाच जणांकडून राहत्या घरातून व फोन पे च्या माध्यमातून 11 लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.