62 नागरिकांना आज डिस्चार्ज; 465 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
स्थैर्य, सातारा दि.9 : आज 11 संशयित नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. तसेच जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 62 नागरिकांना आज दहा दिवसांनतर घरी सोडण्यात आले, तर 336 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
बाधित नागरिकांमध्ये पाटण तालुक्यातील पापर्डे येथील 30 वर्षीय पुरुष, सणबुर 35 वर्षीय महिला.,
खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील 14 वर्षीय युवती, मोरवे येथील 35, 33 वर्षीय पुरुष, निप्रो इंडिया कार्पोरेशन शिरवळ येथील 28, 62 वर्षीय पुरुष.,
सातारा तालुक्यातील सातारा शहरातील लक्ष्मीटेकडी येथील 45 वर्षीय पुरुष, कामाठीपूर 40 वर्षीय महिला.,
खटाव तालुक्यातील मांडवे येथील 32 वर्षीय महिला व 75 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
336 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 27, उपजिल्हा रुग्णालय फलटण येथील 9, शिरवळ-खंडाळा येथील 46, रायगाव येथील 22, पानमळेवाडी येथील 125, मायणी येथील 41, महाबळेश्वर येथील 4, खावली येथील 62 असे एकूण 336 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने घेण्यात आले असुन पुणे येथे तपासणी करीता पाठविण्यात आले आहेत.
62 नागरिकांना आज डिस्चार्ज
डिस्चार्ज देऊन घरी सोडण्यात आलेल्या नागरिकांमध्ये जावळी तालुक्यातील दुदुस्करवाडी येथील 7 पुरुष, 11 महिला, 2 युवक व 2 युवती,
खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील 1 पुरुष,
पाटण तालुक्यातील मल्हारपेठ येथील 1 पुरुष,
सातारा तालुक्यातील कुस येथील 2 महिला, गोडोली येथील 2 पुरुष व 1 महिला, शेंद्रे येथील 1 महिला, सातारा येथील 1 महिला, कण्हेर येथील 3 महिला 4 पुरुष व 2 बालक, सातारा शहरातील शनिवार पेठेतील 1महिला व 1 बालक, रामकृष्णनगर सातारा येथील 3 पुरुष व 3 महिला, अमरलक्ष्मी सोसायटी संभाजीनगर येथील 1 पुरुष, कारी येथील 1 पुरुष,
वाई तालुक्यातील परखंदी येथील 1 बालक, शेंदुरजणे येथील 2 महिला व 1 बालक, शाहबाग येथील 1 महिला, वाई शहरातील रविवार पेठेतील 1 पुरुष व 1 महिला,
खटाव तालुक्यातील उंबर्डे येथील 1 पुरुष,
माण तालुक्यातील दहिवडी येथील 2 पुरुष व 2 महिलांचा समावेश आहे.
घेतलेले एकूण नमुने 32463
एकूण बाधित 5650
घरी सोडण्यात आलेले 2677
मृत्यू 174
उपचारार्थ रुग्ण 2799