
दैनिक स्थैर्य । दि. २० जुलै २०२१ । सातारा । विद्यावर्धिनी चॅरिटेबल ट्रस्ट संचलित छत्रपती शाहू अकॅडमी या शाळेने सलग ११ व्या वर्षी १० वीच्या १०० टक्के निकालाची उज्वल परंपरा अखंडित ठेवली असून एक वेगळा कीर्तिमान प्रस्थापित केला.
शाळेतील १० वीची विध्यार्थीनी मृणाली बर्गे हिने ९९.२० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. मानसी चोटालिया व श्रेया पाटील दोघींनी ९८.४० टक्के गुण मिळवून संयुक्तिक व्दितीय क्रमांक मिळवला. अथर्व पटेल याने ९८.२० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला. शाळेतील ७४ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळवले असून १८ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी मिळवली. या उज्वल यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा श्रीमंत छ. सौ. वेदांतिकाराजे भोसले, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. डिंपल जाधव आणि सर्व शिक्षकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.