दैनिक स्थैर्य । दि. २३ जून २०२३ । बारामती ।
बारामती एमआयडीसी येथील सुयश आँटो प्रा लि कंपनीची असलेली सुयश आँटो प्रा.लि. सेवकांची सहकारी पतसंस्थेचे २२ वी वार्षिक सर्व साधारण खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न होऊनसभासदांना १०% लाभांश वाटप जाहीर करण्यात आला.या वेळी संस्थेचे अध्यक्ष श्री भारत नाना जाधव यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडली. सचिव नंदकुमार गवारे यांनी सन 2022- 2023 या वर्षातील अहवाल वाचन केले. संस्थेकडून प्रत्येक सभासदाला पाच लाख पर्यंत कर्ज मिळते व आपत्कालीन स्थिती मध्ये पन्नास हजार रुपये कर्ज दिले जात तसेच सभासदांना विमा सुद्धा उतरविण्यात आला आहे सभासदाच्या आर्थिक उन्नती साठी नेहमी प्रत्यनशील राहू असे प्रतिपादन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भारत नाना जाधव यांनी सांगितले.
हया वेळी संस्थेचे अध्यक्ष भारतनाना जाधव,उपअध्यक्ष पोपटराव धुले. सचिव नंदकुमार गवारे व कंपनीचे प्लांटहेड मनोज इंगळेसाहेब व डेप्युट्टी मैनेजर महेंद्र निगडे व सिनिअर इंजिनियर शिरिष राऊत व खजिनदार सोमनाथ भोंग उपस्थित होते. प्रमोद बनकर व सोमनाथ माने यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन दिनेश देशमुख यांनी केले. व आभार पोपटराव धुले यांनी मानले. कार्यक्रमास सर्व संचालक व सभासद वर्ग उपस्थित होते.