स्थैर्य,मुंबई,दि ११: मुकेश अंबानींच्या घराबाहेर थांबलेल्या स्कॉर्पियोचे मालक मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणाचा तपास करत असलेल्या महाराष्ट्र ATS ने क्राइम इंटेलिजेंस यूनिटचे माजी API सचिन वझे यांची 10 तास चौकशी केली. सूत्रांनी सांगितल्यानुसार, रात्री उशीरा ते आपला जबाब नोंदवण्यासाठी ATS कार्यालयात दाखल झाले आणि गुरुवारी पहाटे त्यांची चौकशी पूर्ण झाली. ATS ने याप्रकरणी हत्या आणि कट रचल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
सूत्रांनी सांगितल्यानुसार, ATS प्रमुख जयजीत सिंह यांनीच सचिन वझेंची चौकशी केली. त्यांनी स्कॉर्पियोच्या मालकाशी असलेले संबंध आणि त्यांच्या पत्नीने केलेल्या आरोपांबाबत वझेंना प्रश्न विचारले. हिरेन यांची पत्नी आणि त्यांच्या मुलाचे स्टेटमेंट घेण्यासाठी त्यांना बुधवारी एटीएसच्या ऑफीसमध्ये बोलावले होते.
सचिन वझेंना विचारलेले संभाव्य प्रश्न
सूत्रांनी सांगितल्यानुसार, ATS च्या अधिकाऱ्यांना अँटीलियाबाहेर आढळलेली स्कॉर्पियो आणि मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूविषयी सचिन वझेंना प्रश्न विचारले.
- तुम्हाला अँटीलियाबाहेर स्कॉर्पियोमध्ये जिलेटिनच्या कांड्या असल्याची माहिती कशी आणि कधी लागली ?
- घटनास्थील जाणारे तुम्ही पहिले अधिकारी होता का आणि तेथे जाऊन तुम्ही काय केले ?
- तुम्ही स्कॉर्पियोचे मालक मनसुख हिरेन यांना अधिपासून ओळखत होता का ?
- त्यांच्या पत्नीने सांगितल्यानुसार, तुम्ही हिरेन यांची कार चार महिन्यांपासून वापरत होता, हे खरं आहे का ?
- तुम्ही शिवसेना नेते धनंजय गावडे यांना ओळखता का ?
वझे म्हणाले- माझा पाठलाग केला जात आहे
या चौकशीदरम्यान सचिन वझेंनी दावा केला आहे की, काहीजण सतत त्यांचा पाठलाग करत आहेत. वझेंच्या दाव्यानंतर मुंबई पोलिसांनी एक गाडी ताब्यात घेतली असून, त्या गाडीचा नंबर खोटा असल्याचे समोर आले आहे. सध्या पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.