सहा फ्लॅट आणि दोन दुकाने गहाण ठेऊन गरजवंतांच्या मदतीसाठी सोनू सूदने घेतले 10 कोटींचे कर्ज


 

स्थैर्य,दि ९: लॉकडाऊनच्या काळात आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या लोकांसाठी अभिनेता सोनू सूद देवदूत म्हणून पुढे आला. अनेक गरजू लोकांना त्याने मदतीचा हात दिला. कशाचीही पर्वा न करता त्याने लोकांना भरभरून मदत केली. त्यामुळे त्याचे कौतुकही झाले. पण यासाठी सोनूला आपली मालमत्ता गहाण ठेवावी लागली. वृत्तानुसार, गरजूंच्या मदतीसाठी सोनू सूदने एक-दोन नव्हे तर आपल्या तब्बल आठ मालमत्ता गहाण ठेवल्या आणि त्यातून त्याने 10 कोटींचे कर्ज घेतले अशी माहिती समोर आली आहे. पण सोनूकडून याबाबतचा अद्याप कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही.

सर्वोच्च न्यायालयाचा मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यास नकार; आता पुढील सुनावणी 25 जानेवारीला

दोन दुकाने आणि फ्लॅट गहाण ठेवले

लॉकडाऊनच्या काळात लोकांच्या अडचणी पाहून अस्वस्थ झालेल्या सोनूने त्याच्या एकूण आठ मालमत्ता गहाण ठेवल्या. त्यातून त्याने 10 कोटी रुपये उभे केले. मनी कंट्रोल या वेब पोर्टलने याबाबतची माहिती दिली आहे. जुहू येथील पॉश आणि हायप्रोफाईल परिसरातील आपली दोन दुकाने आणि सहा फ्लॅट सोनूने गहाण ठेवले आहेत. ही दोन्ही दुकाने तळमजल्यावर आहेत. तर शिवसागर को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटीत त्याचे फ्लॅट आहेत. ही सोसायटी इस्कॉन मंदिराजवळील ए. बी. नायर रोडवर आहे.

पत्नीची मालमत्ताही गहाण ठेवली

या आठ मालमत्ता गहाण ठेवून त्याबदल्यात त्याने बँकेकडून 10 कोटीचं कर्ज घेतले आहे. दस्ताऐवजानुसार त्याने 10 कोटींचे कर्ज घेण्यासाठी पाच लाख रुपये नोंदणी शुल्कही भरले आहे. यातील काही मालमत्ता त्याची पत्नी सोनालीच्या नावावर असल्याचे सांगितले जाते.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!