दैनिक स्थैर्य | दि. २ मार्च २०२४ | फलटण |
फलटण शहरातील रविवार पेठ येथे उघडा मारूती मंदिराजवळील मुथूट फायनान्स कंपनीच्या ऑफिससमोर दि. १ मार्च २०२४ रोजी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास गोल्ड लोण भरण्यासाठी निघालेले अशोक खंडेराव भगत (रा. मेहता हाईट्स, रविवार पेठ, फलटण) यांची १ लाख २२ हजार रूपयांची बॅग दोन मोटारसायकलस्वारांनी हिसकावून नेण्याचा प्रयत्न केला. यावेळी झालेल्या झटापटीत अशोक भगत हे जखमी झाले.
या प्रकरणी पोलिसांनी दोन अज्ञात चोरट्यांविरोधात फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सपोनि शिंदे करीत आहेत.