स्वराज्य फाउंडेशनच्यावतीने महाबळेश्वर तालुक्यात 700 फळझाडांचे वाटप


स्थैर्य, फलटण दि. 22 ऑगस्ट : मौजे कोट्रोशी (ता. महाबळेश्वर) येथे रविवार दि. 17 रोजी स्वराज्य फाउंडेशनच्यावतीने वृक्षारोपण व फळझाडांचे वाटप उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या उपक्रमाअंतर्गत कोट्रोशी, गोरोशी, दाभे दाभेकर आणि वाळणेया गावांमध्ये सुमारे 700 फळझाडांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरवातीला खरोशी गावाचे सुपुत्र, कै. भिवाजी अंबाजी कदम (समाजसेवक) यांच्या स्मृतीला आदरांजली अर्पण करण्यात आली.

स्वराज्य फाउंडेशनने ‘एक झाड – एक जबाबदारी’ हे घोषवाक्य स्वीकारत, झाडांचे संगोपन करण्याचे उपस्थितांना आवाहन करण्यात आले. विठ्ठलशेठ धनावडे (उद्योजक, तापोळा), रामचंद्र मोरे (आमशी), संजय शेलार (शिवसेना तालुकाप्रमुख, कोट्रोशी), किशोर जाधव (सरपंच, झांजवड), अजय रिंगे (अध्यक्ष, महाबळेश्वर तालुका पोलीस पाटील संघटना), प्रशांत तांबे (उद्योजक, वाळणे), अर्जुन शेलार (कोट्रोशी) या मान्यवरांनी उपस्थितांना वृक्षारोपणाचे महत्व सांगितले. स्वराज्य फाऊंडेशनच्या महिला कार्यकर्त्या सौ. सुजाताताई कदम (सोनाट), सौ. आशाताई कदम (खांबील) आणि सौ. स्वाती शेलार (कोट्रोशी) यांनी जास्तीत जास्त महिलांनी सहभागी घेण्याचे आवाहन केले.

संस्थेचे सहसचिव गोविंद शिंदे (कोळघर) यांनी संस्थेच्या सर्व समाजोपयोगी योजनेची माहिती सांगितली. संस्थेचे अध्यक्ष संजय जाधव (चिखली) यांनी समाजाच्या उत्कर्षासाठी योगदान देण्याची गरज असल्याचे नमूद केले. राम शिंदे (तेटली) तसेच ह.भ.प. सुभाष महाराज शेलार (कोट्रोशी) यांनी सूत्रसंचालन केले. बी.व्ही.शेलार (संचालक कोयना एज्युकेशन) यांनी कार्यक्रमास सहकार्य लाभले. उपाध्यक्ष श्री. संजय उतेकर यांनी आभार मानले. पर्यावरणाच्या रक्षणाची साक्ष देणारा हा उपक्रम समाजासाठी निश्चितच प्रेरणादायी ठरला.


Back to top button
Don`t copy text!