दैनिक स्थैर्य । दि. ०३ जून २०२२ । फलटण । फलटण तालुक्यातील सोनगाव येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सादर कार्यक्रमासाठी गावातील तरुण मंडळ, ग्रामस्थ व मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी सरपंच व सदस्य पोपटराव बुरुंगले यांनी केले. राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याविषयी माहितीपर मनोगत प्रा. राजेश निकाळजे, निलेश एजगर व संतोष ठोंबरे यांनी व्यक्त केले. प्रमुख व्याख्याते प्रा. जालिंदर वाघमोडे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा जीवनपट सादर केला.