
दैनिक स्थैर्य । दि. १० जून २०२२ । सातारा । सातारा जिल्ह्यातील सातारा कराड सह इतर सात नगरपालिकांच्या प्रभाग रचना यांचा कार्यक्रम अंतिम झाल्यानंतर आरक्षण सोडतीचा कार्यक्रम ही निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे 13 जून रोजी त्या-त्या नगरपालिकांच्या कार्यक्षेत्रात हा आरक्षण सोडतीचा कार्यक्रम होणार आहे त्यामुळे सातारा जिल्ह्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे सदस्य पदांच्या आरक्षण सोडतीची नोटीस दहा जून रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. ही नोटीस त्या पालिकेच्या या संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दिनांक 13 जून रोजी सातारा कराड रहिमतपूर म्हसवड वाई महाबळेश्वर फलटण पाचगणी व मेढा या नगरपालिकांनी 13 जून रोजी उपजिल्हाधिकारी दर्जाच्या सक्षम प्राधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये आरक्षण सोडतीचा कार्यक्रम पार पाडावयाचा आहे . सातारा पालिकेच्या 25 प्रभागांची आरक्षण सोडत पालिकेच्या छत्रपती शिवाजी सभागृहात काढण्यात येणार आहे आरक्षण सोडतीचा कार्यक्रम सकाळी 11 वाजता होणार असल्याचे पालिकेचे प्रशासन व व मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी सांगितले.
त्यानंतर 15 जून रोजी आरक्षणाची अधिसूचना नागरिकांच्या हरकती साठी स्थानिक पातळीवर जिल्हाधिकारी कार्यालय आणि नगर परिषदांच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्याचे सूचित करण्यात आले आहेत आरक्षण व सोडतीचा अनुषंगाने हरकती व सूचना 21 जून पर्यंत दाखल करावयाचे आहेत . या सूचना 24 जून पर्यंत अहवालाच्या रुपाने विभागीय आयुक्तांना पाठवायच्या असून विभागीय आयुक्तांनी नगर परिषदेच्या सदस्य पदांच्या आरक्षणास 29 जून पर्यंत अधिसूचना अंतिम करून त्यांना मान्यता द्यावयाची आहे . कलम दहा नुसार सदस्य पदांच्या आरक्षणाची अंतिम माहिती एक जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालय आणि नगरपालिकांच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करावयाचे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.