श्री रूक्मिणी मातेच्या पालखी सोहळ्याचे दि ३ जून रोजी भक्तीमय वातावरणात प्रस्थान

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०४ जून २०२२ । कौडण्यपूर । टाळ, मृदुंगाचा गजर व विठ्ठलनामाचा जयघोष करीत श्री ‌रुख्मणी मातेच्या पालखी सोहळ्याने सासरच्या ओढीने श्री क्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान ठेवली .

महाराष्ट्रातील शेकडो पालखी सोहळे हे माहेरच्या ओढीने श्री क्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान ठेवतात . तर महाराष्ट्रातील स.न.१५९४ सालापासुन संत सदगुरु सदाराम महाराजांनी सुरू केलेली पहीली पालखी श्री क्षेत्र कौंडण्यपुर येथुन श्री क्षेत्र पंढरपुरला जाते . कोरोना कालातही शासनाच्या विषेश नियोजनाने पालखी परंपरा अखंडपणे सुरु राहीली . आज दोन वर्षांच्या कोरोना प्रतीबंधानंतर रुक्मिणी मातेच्या माहेरच्या पालखीचे अत्यंत ऊत्साहात व भक्तीपुर्ण वातावरणात प्रस्थान झाले . आज वारकर्यामधे विशेष ऊत्साह पहावयास मिळाला . श्री रूक्मिणी मातेची विदर्भातील एकमेव मानाची पालखी आहे . पालखीचे हे ४२८ वे वर्ष आहे.सकाळी श्री संस्थानचे अध्यक्ष श्री नामदेवजी अमालकर ,पालखी सोहळा प्रमुख तथा सचिव सदानंद साधु ह्यांनी सपत्नीक पादुकांची विधीवत पूजा , अभिषेक व आरती केली . यावेळी पालखी प्रमुख विश्वस्त श्री सुरेश काका चव्हाण ,सह प्रमुख हभप सर्जेराव महाराज देशमुख,हभप पंकज महाराज महल्ले, श्री सुनील वेरूलकर , विश्वस्त श्री अतुल ठाकरे.विणेकरी विठोबाजी बागडे यांच्यासह हजारों श्री रूक्मिणी मातेचे भक्त उपस्थित होते.
हा सोहळा अमरावती, कारंजा, वाशीम ,परभणी, उस्मानाबाद गंगाखेड ,बार्शी मार्गे ३३ दिवसांंचा प्रवास करून दि ६ जुलै रोजी पंढरपुर प्रवेश करेल मुक्कामासाठी संस्थान च्या धर्मशाळेत खात चौक पंढरपुर येथे राहुन‌ दि १३ जुलै रोजी परतीच्या प्रवासाला निघेल .
ह्या सोहळ्याला संस्थानचे अध्यक्ष श्री नामदेव अमालकर, उपाध्यक्ष श्री वसंत डाहे,पालखी सोहला प्रमुख सचिव श्री सदानंद साधु , पालखी प्रमुख विश्वस्त श्री सुरेश काका चव्हाण, हभप सर्जेराव महाराज देशमुख, व वारकरी सहभागी राहतील. परतीचा प्रवास दि.१३ जुलै रोजी सुरु होइल. श्री क्षेत्र कौंडण्यपुर विदर्भ दि १४ जुलै गुरूवार रोजी दहीहंडी ने पालखी सोहळ्याची सांगता होईल.


Back to top button
Don`t copy text!