शिवसेनेची सध्या फरपट सुरू आहे : विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि. 24 : शिवसेनेची सध्या फरपट सुरू आहे. त्यांना सत्तेत असल्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी बरोबर फरफटत जावे लागत आहे. त्यांची इच्छा आहे की नाही माहीत नाही पण शिवसेना महाविकासआघाडी सोबत गेल्यापासून शिवसेनेची फरफटच सुरू आहे असे विधान विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सातारा येथे केले.

विधान परिषद निवडणुकीमध्ये शिवसेनेने भाजपावर टीका केली परंतु आमची एक तरी जागा देऊन आली. त्यांचा मुख्यमंत्री असताना त्यांना शून्य जागा मिळाल्या. काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येक गावात अस्तित्व आहे. त्यामुळे शिवसेनेने ग्रामपंचायत निवडणुका पूर्ण ताकतीने लढविण्याचा निर्णय घेतला तरी शिवसेनेला किती जागा देणार हाही त्याठिकाणी महत्त्वाचा आणि संशोधनाचा विषय आहे. नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेला एकही जागा निवडून आणता आलेली नाही. उलट भाजपाला एक जागा तरी मिळालेली आहे, असेही दरेकर यांनी स्पष्ट केले.

शिवसेनेचा मुख्यमंत्री असूनही शिवसेनेला अपयश मिळाले असेच मानावे लागेलं. प्रत्येक गावात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे अस्तित्व आहे तसेच शिवसेनेचे नाही. त्यामुळे महाविकासआघाडीने ग्रामपंचायत निवडणुका एकत्रित लढविण्याचा निर्णय घेतला तर हे पक्ष शिवसेनेला किती जागा देणार हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे असेही दरेकर म्हणाले.मराठा आरक्षण प्रश्नी सरकार भांबावून गेले आहे.आता आम्हाला सरकारच्या भूमिकेवर संशय येतो, अशी शंका व्यक्त करत त्यांनी शेतकरी आंदोलन बोलवता धनी वेगळा आहे, असे सांगितले. दरम्यान, भाजपचे कोणीही आमदार पक्ष सोडून जाणार नाहीत, असे त्यांनी सांगितले.

चिंचणेर निंब (ता. कोरेगाव) येथील हुतात्मा जवान सुजित किर्दत यांच्या कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी ते आले होते त्यावेळी सातारा येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भाजप आमदार पक्ष सोडणार ही चर्चा आळवावरच्या पाण्यासारखी आहे.भाजप हा पक्ष भविष्य असलेला पक्ष आहे.जम्मू काश्मीरसह इतर ठिकाणी यश मिळवत असताना कोण सोडून जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी विठ्ठल बलशेठवार,संदीप शिंदे,गणेश पार्टे आदी उपस्थित होते

Shiv Sena is currently in turmoil: Leader of Opposition Praveen Darekar


Back to top button
Don`t copy text!