शहीद जवान विपुल इंगवले यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात भोसे येथे अंत्यसंस्कार


दैनिक स्थैर्य । दि. ०६ जून २०२२ । सातारा । शहीद जवान विपुल इंगवले यांच्या पार्थिवावर आज भोसे ता. कोरेगाव येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलीस दल व भारतीय सैन्य दलाच्या तुकडीने हवेत बंदुकींच्या फैरी झाडून तसेच अंतिम बिगुल वाजवून शहीद जवानास मानवंदना दिली.

यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, आमदार शशिकांत शिंदे, आमदार महेश शिंदे, कोरेगावच्या प्रांताधिकारी ज्योती पाटील, गटविकास अधिकारी क्रांती बोराटे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी विजयकुमार पाटील यांनी शहीद जवान विपुल इंगले यांना पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना दिली.

शहीद विपुल इंगले यांचे बंधू विशाल यांनी पार्थिवाला मुखअग्नी देऊन अंत्यसंस्कार केले. यावेळी लष्कराचे विविध आजी, माजी अधिकारी, विविध विभागांचे अधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!