शरदराव पवार पडळकरांचे बाप आहेत! गोपीचंद पडळकरांनी भुंकणं बंद करावे-हेमंत पाटील

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०२ जून २०२२ । सातारा । भारतीय जनता पार्टीने मोकाट सोडलेले आमदार गोपीचंद पडळकर यांचे राजकीय वर्तन अत्यंत निंदनीय असून त्यांच्याकडून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वो आणि देशाचे आदरणीय नेतृत्व शरद पवार यांच्यावर सातत्याने करण्यात येणाऱ्या टिकेतून त्यांची बालबुद्धी प्रतीत होते, असे प्रतीपादन इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी गुरूवारी केले.

कुणावर टीका करायची? टीका करतांना कुठल्या शब्दांचा वापर करायचा? याची जाण पडळकरांना नाही. त्यांचे राजकीय भवितव्य अंधातरी असल्याने त्यांच्या डोक्यात ‘केमिकल लोचा’ झाला आहे. अशात त्यांना मानसोपचारतज्ञांकडून उपचार करून घ्यावा,असा सल्ला देखील पाटील यांनी पडळकरांना दिला.पडळकरांसारखे हजारो ‘गल्लीछाप’ नेते शरद पवार त्यांच्या खिशात घेवून फिरतात. त्यामुळे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मोकाट सोडण्यात आलेल्या पडळकरांनी मर्यादेत राहावे अन्यथा त्यांना राजकीय तर नाहीच सामाजिक महत्व देखील राहणार नाही, असा सूचक इशारा पाटील यांनी दिला.

राज्यातील राज्यसभा निवडणुकीसंबंधी भाष्य करतांना ते म्हणाले की, छत्रपती संभाजी राजे यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यासंबंधीचा निर्णय हा सर्वस्वी शिवसेनेच्या अंतर्गत प्रश्न होता. कुणाला उमेदवारी द्यायची आणि कुणाला नाही, हे पक्षप्रमुखांनी ठरवले.शिवसेनेने ज्यांना उमेदवारी दिली आहे ते संजय पवार यांनी गेल्या निवडणुकीत चांगले संघटनात्मक काम केले होते. त्यांना पक्षाने प्रामाणिकता, निष्ठेचे बक्षीस दिले आहे. पवार यांना उमेदवारी देण्यापूर्वी छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाचा विचार करण्यात आला होता. पंरतु, शिवसेनेत प्रवेश करण्यास त्यांनी नकार दिल्याने थेट शिवसैनिकाला पक्षाने संधी दिली. भाजप मात्र यावर राजकारण पेटवण्याचा प्रयत्न करीत आहे. संभाजीराजे यांचा खर्या अर्थाने भाजपने दगाफटका केला, असा आरोप देखील त्यांनी केला.


Back to top button
Don`t copy text!