
दैनिक स्थैर्य । 7 जुलै 2025 । फलटण । कोळकी (शारदानगर) येथील विमा प्रतिनिधी यशवंत हरिभाऊ पालकर व संजय पालकर यांचे वडील व आई सौ. पालकर यांनी एरिकेशन डिपार्टमेंट येथे त्यांनी नोकरी केली होती. त्यांच्या शताब्दी महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी पंचायत समितीचे सदस्य सचिन भैय्या रणवरे, कोळकीच्या माजी सरपंच सौ. रेश्मा संजय देशमुख, माजी उपसरपंच विकास भैय्या नाळे तसेच संजय देशमुख, अक्षय मुळीक, सुरेश कदम, रवी पुंजा आदी मान्यवर उपस्थित होते.