दैनिक स्थैर्य | दि. १७ मे २०२४ | बारामती |
एसीबीच्या पथकाने एक कोटीच्या लाच प्रकरणातील ५ लाख रुपयांचा हप्ता सहायकामार्फत घेतल्याचा गुन्हा दाखल झालेले बीडच्या आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हरिभाऊ खाडे यांच्या चाणक्यपुरीतील घराची गुरुवारी न्यायालयाच्या परवानगीने झडती घेतली. या घरातून १ कोटी ८ लाखांची रोकड, ७२ लाख रुपयांचे ९७० ग्रॅम सोने, ४ लाख ६२ हजार रुपये किमतीची साडेपाच किलो चांदी असा एकूण १ कोटी ८५ लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला. तसेच खाडेच्या नावावर बारामती- इंदापूरमध्ये प्रत्येकी एक फ्लॅट, इंदापूरमध्ये व्यापारी गाळा तसेच बारामती व परळीत दोन प्लॅट असलेली कागदपत्रेही जप्त केली.
या प्रकरणात कुशाल प्रवीण जैन यास पैसे घेताना बुधवारी अटक झाली होती, तर पोलिस निरीक्षक खाडे व सहायक फौजदार रविभूषण जाधवर फरार झाले. या दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला असून त्यांना तडकाफडकी निलंबितही करण्यात आले. बीड शहरातील जिजाऊ मल्टिस्टेट पतसंस्थेत गतवर्षी सुमारे १०० कोटींचा घोटाळा झाला होता. या पतसंस्थेचे प्रमुख बबन शिंदे, अध्यक्षा अनिता शिंदे, व्यवस्थापक सुनीता वांढरे व इतरांवर एकूण ४ गुन्हे नोंद असून याचा तपास खाडे याच्याकडे होता. याप्रकरणी अनिता शिंदे अटकेत असून इतर फरार आहेत. बबन शिंदे याने दोन व्यावसायिकांना बांधकामचे साहित्य पुरवल्यापोटी ६० लाख रुपये दिले होते. त्यामुळे या दोन्ही व्यावसायिकांची चौकशी सुरू होती. या गुन्ह्यात आरोपी करण्याची भीती दाखवून, खाडे याने दोघांकडे प्रत्येकी ५० लाख रुपये लाच मागितली होती. तर ३० लाखांत तडतोड झाली होती. यातील ५ लाख रुपयांचा पहिला हफ्ता गुरुवारी कापड व्यापारी कुशाल प्रवीण जैन याने खाडे यांच्यावतीने घेतला होता.
फौजदाराच्या घरात २५ तोळे सोने
सहायक फौजदार जाधवर याच्या घराची बुधवारी रात्रीच झडती घेतली. तिथे १५ हजार रुपयांची रोकड आणि २५ तोळे सोने सापडले. दरम्यान, खाडेचा सहायक व्यापारी कुशाल प्रवीण जैनला न्यायालयाने गुरुवारी २० मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. तडकाफडकी निलंबितही करण्यात आले. बीड शहरातील जिजाऊ मल्टिस्टेट पतसंस्थेत गतवर्षी सुमारे १०० कोटींचा घोटाळा झाला होता. या पतसंस्थेचे प्रमुख बबन शिंदे, अध्यक्षा अनिता शिंदे, व्यवस्थापक सुनीता वांढरे व इतरांवर एकूण ४ गुन्हे नोंद असून याचा तपास खाडे याच्याकडे होता. याप्रकरणी अनिता शिंदे अटकेत असून इतर फरार आहेत. बबन शिंदे याने दोन व्यावसायिकांना बांधकामचे साहित्य पुरवल्यापोटी ६० लाख रुपये दिले होते. त्यामुळे या दोन्ही व्यावसायिकांची चौकशी सुरू होती. या गुन्ह्यात आरोपी करण्याची भीती दाखवून, खाडे याने दोघांकडे प्रत्येकी ५० लाख रुपये लाच मागितली होती. तर ३० लाखांत तडतोड झाली होती. यातील ५ लाख रुपयांचा पहिला हफ्ता गुरुवारी कापड व्यापारी कुशाल प्रवीण जैन याने खाडे यांच्यावतीने घेतला होता.