युगकवी बा.सी.मर्ढेकर यांची जयंती मर्ढे येथे उत्साहात


मर्ढे – बा.सी.मर्ढेकर यांच्या प्रतिमेस अभिवादनप्रसंगी विनोद कुलकर्णी, शामराव मर्ढेकर, निलेश महिगावकर, सविता कारंजकर नंदकुमार सावंत, तुषार महामूलकर व इतर.

स्थैर्य, सातारा, दि. 4 डिसेंबर : युगकवी बा.सी.मर्ढेकरांची कविता विश्वात्मक पसायदान मागणारी होती.दोन महायुद्धांचा या कवितेवर प्रभाव होता. दुर्बोधतेचा शिक्का बसूनही ही कविता काळाच्या कसोटीवर आजही टिकून आहे, कारण ती अभिजात आहे, असे मत युवा लेखक कवी निलेश महिगावकर यांनी मर्ढे येथील बा.सी.मर्ढेकरांच्या निवासस्थानी आयोजित केलेल्या जयंती कार्यक्रमात मांडले. यावेळी अध्यक्षस्थानी ऊद्योजक . शामराव मर्ढेकर होते.तर महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा शाहूपुरी सातारा,चे अध्यक्ष नंदकुमार सावंत तसेच, 99 व्या अखिल मराठी भारतीय साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.

महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा शाहूपुरी सातारा, आयोजित युगप्रवर्तक कवी बा.सी.मर्ढेकर जयंती कार्यक्रम, नूतनीकरण केलेल्या बा.सी.मर्ढेकरांच्या मर्ढे येथील निवासस्थानी 1 डिसेंबर रोजी नुकताच ऊत्साहात संपन्न झाला.

युगकवी बा.सी. मर्ढेकरांच्या प्रतिमेस अभिवादन करून कार्यक्रमाची सुरूवात झाली. यावेळी 99 व्या अखिल मराठी भारतीय साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष श्री. विनोद कुलकर्णी यांनी प्रास्ताविक मांडले, याप्रसंगी बोलताना ते म्हणाले, ’काही वर्षापूर्वी दुरावस्थेत असलेले बा.सींचे राहते घर मसाप शाहुपूरीच्या पुढाकाराने आपण मूळ ढाचा न बदलता सुंदर केले. सद्या राज्यभरातून आवर्जून लोकं इथं भेट देतात आणि समाधान व्यक्त करतात. दुसारीकडे बा.सींच्या चरित्रलेखनाचे कामही अंतिम टप्प्यात आले असून बा.सींच्या अपरिचीत साहित्यावर आणि आयुष्यावर त्यातून प्रकाश टाकणार आहे.’ प्रमुख आतिथी निलेश महिगावकर म्हणाले, बा.सींच्या कवीतेसोबतच त्यांचे बोलीभाषेचे योगदान अफाट आहे. त्यांच्या नाटक आणि कादंबरीवर सातारी भाषेची छाप आहे. आज सातारी भाषेला बोलीचा दर्जा नाही, हे कटू वास्तव आहे, यावर अभ्यासपूर्वक काम करावे लागेल.’

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना श्री. शामराव मर्ढेकर म्हणाले, आपले उपक्रम महत्वाचे असून त्याला सर्वतोपरी प्रोत्साहन आणि पाठींबा देण्यात येईल असे सूतोवाच त्यांनी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. सविता कारंजकर यांनी अत्यंत ओघवत्या भाषेत केले. मसाप शाहूपुरीचे अध्यक्ष श्री नंदकुमार सावंत यांनी ऊपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमास म.सा.प.पदाधिकारी संजय माने, सचिन सावंत, वजीर नदाफ, अमर बेंद्रे, आर डी पाटील, लेखिका ऐश्वर्या भोसले, सविता कारंजकर, तुषार महामुलकर, साईराज भोसले,सतीश घोरपडे आणि मर्ढेकर ग्रामस्थांची ऊपस्थिती होती.


Back to top button
Don`t copy text!