मॅटर्निटी इन्श्युरन्ससाठी गाईड : पालकत्वाच्या तणावमुक्त प्रवासासाठी तुमचा विश्वसनीय सोबती

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


‘पालक बनणे’ हा प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वात आनंदी अनुभवांपैकी एक आहे. हा एक खास प्रवास आहे ज्यात पुष्कळ आनंदाबरोबर आव्हानेदेखील असतात आणि त्यासोबत येणार्‍या जबाबदार्‍यांसाठी तयार राहणे खूपच आवश्यक आहे. तयार असण्याचा एक पैलू म्हणजे सर्व गोष्टींची काळजी घेण्यासाठी ‘फायनान्शियल सिक्युरिटी’ असणे.

हल्ली ‘वैद्यकीय महागाई’ वाढत आहे आणि तुम्हाला माहित आहे की प्रत्येक उपचाराचा खर्च खूपच जास्त आहे. गर्भावस्थेदरम्यान, अनेक अनपेक्षित खर्च उद्भवू शकतात. कारण तुम्हाला आई आणि बाळ दोघांची काळजी घेणे आवश्यक असते. स्वत:ला आधीच तयार करणे चांगले आहे, जेणेकरून तुम्हाला पुढे काळजी करण्याची गरज नाही. ‘मॅटर्निटी इन्श्युरन्सट हा पालक बनण्याच्या तुमच्या प्रवासादरम्यान विश्वसनीय मित्र असल्यासारखा आहे. हा डिलिव्हरीदरम्यान अनेक लाभ प्रदान करतो आणि ही पॉलिसी आई आणि बाळ दोन्ही संरक्षित असल्याची खात्री करते.

मॅटर्निटी इन्श्युरन्सच्या कव्हरेजविषयी :

१. सर्वसमावेशक ‘कव्हरेज’ –
हे ‘कव्हरेज’ तुमच्या बाळाच्या जन्मापूर्वी आणि नंतर तुम्हाला आवश्यक असलेल्या पैशांची मदत करते. यामध्ये हॉस्पिटलमध्ये जाण्याचा खर्च आणि औषधे, तुम्ही राहत असलेली रुम आणि डॉक्टरांची फी यासारख्या इतर गोष्टी कव्हर केल्या जातात. हे सर्जन, नर्स आणि रुग्णवाहिका शुल्कासाठी देखील मदत करते. या कव्हरेजमुळे, तुम्ही अनेक आवश्यक गोष्टींसाठी चांगल्याप्रकारे संरक्षित राहता आणि या सपोर्टमुळे तुमचा तणाव कमी होऊ शकतो आणि तुम्ही शांतपणे तुमच्या बाळाचे स्वागत करण्यावर लक्ष केंद्रित करू शकता.

२. लसीकरण ‘कव्हर’ –
हे कव्हरेज तुमच्या बाळाच्या आरोग्यासाठी कवचासारखे आहे. मॅटर्निटी इन्श्युरन्स जीवनाच्या पहिल्या वर्षात महत्त्वाच्या लसीकरणाच्या खर्चाला कव्हर करण्यास मदत करते. यामध्ये पोलिओ, टिटॅनस, डिप्थीरिया, डांग्या खोकला आणि हिपॅटायटीससाठी लसीकरण समाविष्ट आहे. याने हेदेखील सुनिश्चित होते की तुमच्यालहानग्याला हवे ते संरक्षण मिळते, ज्यामुळे तुम्ही निश्चिंत राहू शकता, हे जाणून की तुमच्या बाळाची चांगल्या प्रकारे काळजी घेतली जात आहे.

३. तुमच्या नवजात बाळाची जन्मापूर्वीची आणि नंतरची काळजी –
आईची बाळाच्या जन्मापूर्वी खूप काळजी घेणे आवश्यक असते. आई आणि बाळ या दोघांना निरोगी ठेवण्यासाठी अनेक तपासण्या आणि औषधे आवश्यक असतात. मॅटर्निटी कव्हर तुमच्या हेल्थ प्लॅननुसार बाळाच्या जन्मानंतर ३० ते ६० दिवसांसाठी सर्व वैद्यकीय खर्चासाठी मदत करते.

४. कॅशलेस उपचार –
मॅटर्निटी इन्श्युरन्स प्लॅन्ससह, तुम्हाला कॅश न भरता सहज उपचार प्राप्त होऊ शकतात. याचा अर्थ असा की जर तुम्ही संपूर्ण भारतात नेटवर्क हॉस्पिटलमध्ये गेलात तर तुम्हाला पैसे सोबत बाळगण्याची काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही त्याठिकाणी कॅश न भरता उपचार मिळवू शकता. त्यामुळे, या कव्हरेजसह, तुम्ही त्वरित देय करण्याच्या त्रासाचा सामना न करता स्वत:ची आणि तुमच्या बाळाची काळजी घेण्यावर लक्ष केंद्रित करू शकता.

५. टॅक्स सेव्हिंग्स –
मॅटर्निटी इन्श्युरन्स प्लॅन्स इन्कम टॅक्स अ‍ॅक्ट, १९६१ च्या सेक्शन ८०ॄ अंतर्गत टॅक्स-सेव्हिंग संधीसह फायनान्शियल लाभ प्रदान करतात. इन्श्युरन्स प्रीमियमवर खर्च केलेले पैसे टॅक्स कॅल्क्युलेशन दरम्यान तुमच्या एकूण उत्पन्नातून कपात केले जाऊ शकतात, ज्यामुळे तुमच्यासाठी आणि तुमच्या बाळासाठी सर्वसमावेशक कव्हरेज सुनिश्चित करून पैसे सेव्ह करण्याचा एक स्मार्ट मार्ग मिळतो.

६. प्रतीक्षा कालावधी –
भारतातील सर्व मॅटर्निटी इन्श्युरन्स प्लॅन्स प्रतीक्षा कालावधीसह येतात, जो ९ महिने ते ६ वर्षे असू शकतो. प्रतीक्षेमुळे येणारा कोणताही तणाव टाळण्यासाठी, कुटुंब सुरू करण्याच्या योजनेपूर्वी महिलांना काही वर्षांपूर्वी मॅटर्निटी इन्श्युरन्स घेण्याची शिफारस केली जाते.हे जेव्हा वेळ येते तेव्हा त्या चांगल्याप्रकारे तयार असल्याचे सुनिश्चित करते.

मॅटर्निटी इन्श्युरन्स फायनान्शियल सिक्युरिटीशी आणि पालकत्वाच्या चिंता-मुक्त आणि आनंददायक प्रवासाशी निगडीत आहे. हा एक सहाय्यक सोबती आहे, जो सर्वसमावेशक कव्हरेज, आवश्यक लसीकरण, प्रसूतीपूर्व आणि नंतरची काळजी, कॅशलेस उपचार आणि टॅक्स सेव्हिंग्स ऑफर करतो.त्यामुळे, जर तुम्ही कुटुंब सुरू करण्याविषयी विचार करत असाल तर मॅटर्निटी इन्श्युरन्सला या अद्भुत साहसात तुमचा मदतगार साथी बनू द्या!

लेखक : भास्कर नेरुरकर,
हेड – हेल्थ अ‍ॅडमिनिस्ट्रेशन टीम, बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स


Back to top button
Don`t copy text!