
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
स्थैर्य, फलटण दि.२४ : नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत फलटण तालुक्यातील डोंबाळवाडी ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध करण्यात आली. यामध्ये किरण हणमंत ढोणे, सौ.स्वाती जालिंदर येळे, सौ.राणी विकास डोंबाळे, तुषार प्रताप पिसाळ, सौ.मोनिका तुकाराम सुळ, पांडुरंग बिरा कोळपे, सौ.नकुसाबाई मारुती कोळेकर यांची ग्रामपंचायत सदस्यपदी बिनविरोध निवड झाली असून, आम्ही सगळे राजे गटाचेच असल्याचे या सर्व सदस्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले.
या प्रसिद्धीपत्रकात सर्व सदस्यांनी नमूद केले आहे की, नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत आम्ही सर्व 7 सदस्य बिनविरोध निवडून आलो असून आम्ही महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण यांच्या नेतृत्त्वाखालील राजेगट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून निवडून आलो आहोत. आमच्या सर्वांचा इतर दुसर्या कोणत्याही पक्षाशी, गटाशी कोणताही संबंध नाही.
