बँक अकाउंट हॅक करुन 45 हजारावर डल्ला 


स्थैर्य, सातारा , दि.९ : अज्ञाताने फोन करुन ‘क्रेडीट कार्ड सुरु करा, पिन जनरेट करा,’ असे खोटे सांगून बँक अकाउंट हॅक करुन तब्बल 45 हजार 899 रुपयांवर डल्ला मारला. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात अज्ञातावर आयटीआय अ‍ॅक्ट व फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला. दरम्यान, तक्रारदार हे सरकारी नोकरदार असून या घटनेने खळबळ उडाली आहे.रामचंद्र बाबूराव घाडगे (वय 58, रा.भोसले मळा, सातारा) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून ते पाटबंधारे विभागात कार्यरत आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी,  घाडगे यांना अनोळखीचा फोन आला. ‘क्रेडीट कार्ड सुरू करा, पिन जनरेट करा,’ असे फोन करणार्‍या अनोळखीने सांगितले. त्यावर तक्रारदार यांनी कोणतीही माहिती दिली नाही. असे असतानाही तक्रारदार यांच्या बँक खात्यातून वन प्लस स्टोअरवर 45 हजार 899 रुपयांची खरेदी केल्याचा त्यांना मेसेज आला.या घटनेनंतर तक्रारदार यांनी बँकेत जाऊन चौकशी केली असता खात्यातून पैसे गेल्याचे स्पष्ट झाले. बँक खाते हॅक करुन पैसे काढल्याचे समोर आल्याने अज्ञाताविरुध्द त्यांनी तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.


Back to top button
Don`t copy text!