
दैनिक स्थैर्य । 5 एप्रिल 2025। सातारा । क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या महान कार्यावर आधारित फुले चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहे या दोघांचेही कार्य महान आहे.
पण या चित्रपटांमध्ये ब्राह्मण समाजाला अवमानित करणारी दृश्ये आहेत. ती दृश्ये सेन्सॉर बोर्डाने वगळावीत, अशी मागणी करणारे निवेदन अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, अखिल ब्राह्मण महासंघ आणि विविध ब्राह्मण संघटनांतर्फे आज सातारा जिल्हाधिकार्यांना देण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी अमोल भुसे यांनी हे निवेदन स्वीकारले. यावेळी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सोनल भोसेकर, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष महिला आघाडी दीपाली कुलकर्णी, अखिल ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष धनंजय कुलकर्णी, सचिव भास्कर मेहेंदळे यांनी निवेदन देताना ब्राह्मण संघटनांची बाजू मांडली. फुले दाम्पत्याचे कार्य महान आहे.
पण या चित्रपटाच्या निमित्ताने आक्षेपार्ह दृष्ये दाखवून ब्राह्मण समाजाच्या अस्मितेवर घाव घातला जात असल्याने ही दृश्ये वगळावीत, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ महाराष्ट्र प्रदेश सभासद सन्मान आयचित, सातारा जिल्हा उपाध्यक्ष वृषाली मेहेंदळे, सुजीत कुलकर्णी, कार्यकारी प्रमुख प्रमोद पंचपोर, सातारा शहर अध्यक्ष निलेश कुमठेकर, युवा आघाडी अध्यक्ष श्रीरंग मेहेंदळे, जयंत कार्ले कर, माधुरी पोतदार, स्मिता थीटे, सुधीर देशपांडे आणि अखिल ब्राह्मण महासंघाचे संचालक मुकुंद फडके, श्रीकांत वेलणकर, प्रा. वि. ना. लांडगे, शशिकांत पंडित, प्रशांत आठवले, जयदीप ठुसे, किरण प्रभुणे आणि कार्यकर्ते उपस्थित होते.