फुले एज्युकेशन तर्फे विजयादशमी दिनी नॅशनल रायफल शुटर पूर्वा शितोळे सन्मानित

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. १५ ऑक्टोबर २०२१ | पुणे | फुले शाहु आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फौंडेशन तर्फे विजयादशमी दिनी बहुउद्देशीय सत्यशोधक केंद्र,धायरी येथे दुपारी रिक्षाचालक अरुण शितोळे यांची कन्या पूर्वा शितोळे नॅशनल रायफल शुटर हिचा संस्थेचे अध्यक्ष सत्यशोधक रघुनाथ ढोक यांचे शुभहस्ते थोरसमाजसुधारक महात्मा जोतीराव फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची फोटो फ्रेम आणि ज्ञानज्योति सावित्रीबाई फुले ,महात्मा फुले गीत चरीत्र व थोर ऐतिहासिक शूरमहिला हे ग्रंथ भेट देऊन सन्मान करण्यात आले.
पूर्वा शितोळे ही हुजूरपागा संस्थेची माजी विद्यार्थिनी असून कॉलेज शिक्षण घेत असताना एन. सी.सी.जॉईन केल्यामुळे रायफल शुटिंगची तिला आवड निर्माण झाली.ती एन. सी.सी.बी व सी परीक्षा पास असून आजपर्यंत राफल शुटिंग मध्ये महाराष्ट्र व भारत देशाचे वतीने 10 व 50 मीटर रायफल शुटिंग मध्ये वेस्ट बंगाल, इंदोर, गुजरात, भोपाळ , केरळ  ,मुंबई असे विविध ठिकाणी तिने सहभाग घेऊन उत्तम बक्षीस मिळवत अंतरदेशीय सुध्दा खेळ गाजवीत आहे.2019 ला पिपरी चिंचवड मेयर कप पण प्रथम नंबर ने जिकून आपली छाप तिने दाखविली आहे परंतु तिने एक खंत व्यक्त केली की इतर राज्याच्या मानाने महाराष्ट्रातील खेळाडूंना आर्थिकदृष्ट्या मदत कोणी करीत नाहीत त्यामुळे खेळाडूंना वेगवेगळ्या ठिकाणी जाणे अवघड होते.सरकारने याकडे लक्ष देणे फार गरजेचे आहे.
यावेळी ढोक म्हणाले की अशा खेळाडूंना स्थानिक नेते, आमदार, खासदार यांनी नॅशनल खेळाडू म्हणून वेगळा निधी राखीव ठेवून मंदिरे, समाज मंदिरे न बांधता  तो निधी अभ्यासिका ,जिम,क्रीडांगण उभी करण्यासाठी वापरला पाहिजे , चांगल्या गरजवंत खेळाडूंना आर्थिक मदत करून  हे खेळाडू सहजपणे आलोंपिक ,एशियाड पर्यंत कसे पोहचतील याकडे लक्ष देणे जरुरीचे आहे.तसेच मोठया उद्योजक व कंपनीने तसेच पुणे मनपाने पूर्वा सारखे खेळाडूंना दत्तक घेऊन आर्थिक मदत ,प्रॅक्टिस साठी हॉल ,मैदान उपलब्ध करून दिले पाहिजे असे देखील ढोक म्हणाले.
याप्रसंगी पूर्वा चे वडील अरुण शितोळे म्हणाले की रिक्षा चालक म्हणुन मी कमी पडत असलो तरीही मुलींसाठी वेळप्रसंगी  कर्ज काढुन तिला स्पर्धा ठिकाणी पाठवीत असतो पण राजकारणी मंडळी स्थानिक भेटून देखील मदत करीत नाहीत याचे वाईट वाटते पण एखादाच दुसर्याभागातील आमदार रोहित पवार सारखा रायफल घेण्यासाठी मदत करतो त्यावेळी मनाला बरे वाटते असे देखील ते बोलले.
यावेळी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या फोटोस पूर्वा व तिचे वडील अरुण यांचे शुभहस्ते हार अर्पण केला तर आज विजयादशमी असल्याने तिच्या 10 मीटर रायफल चे सत्यशोधक ढोक व आशा ढोक यांनी पुजन करून पूर्वा ला पुढील कार्यास शुभेच्छा देऊन मदत मिळविण्यासाठी नक्कीच प्रयत्न करणार याचे आश्वासन देऊन आपल्या भारत देशाचे रायफल शुटिंग मध्ये जगभर नाव झळकेल अशी कामगिरी करावी म्हणून आशिर्वाद दिला.तर आकाश क्षितिज यांनी आभार मानले.

Back to top button
Don`t copy text!