
स्थैर्य, फलटण दि.५ : फलटण शहरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी जुगार अड्ड्यावर छापा टाकून कारवाई केली.
याबाबत फलटण शहर पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, बुधवार दि. 3 रोजी सायंकाळी 5:30 च्या सुमारास पाचबत्ती चौक येथे रोडच्या कडेला असलेल्या गाळ्यात अजय आनंद अहिवळे वय 27 रा. मंगळवार पेठ, फलटण हा बेकायदेशीर पणे पैशावर राजधानी व कल्याण नावाचा मटका स्वीकारताना पोलीसांनी कारवाई केली. यावेळी त्याच्याकडील 6 हजार 765 रुपयांची रोख रक्कम, पंधरा हजार रुपयांचा मोबाईल, शंभर रुपयांचा क्याल्क्यूलेटर व मटक्याच्या पावत्यांच्या नोंदवह्या असा एकूण 21 हजार 870 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला. याबाबतची फिर्याद पोलीस नाईक संदीप लोंढे यांनी दिली असून अजय आनंद अहिवळे याच्याविरोधात गुन्हा नोंद झाला आहे. पुढील तपास पोलीस नाईक विक्रांत लावंड हे करीत आहेत.
अन्य एका धाडीत याच दिवशी सायंकाळी 7:30 च्या सुमारास जयभवानी कॉम्प्लेक्स येथील हॉटेल आसरा शेजारी निलेश राजेंद्र विटकर रा. घडसोली मैदान, फलटण हा बेकायदेशीरपणे कोणताही परवाना नसताना राजधानी नावचा मटका घेताना पोलीसांना आढळून आला. यावेळी त्याच्याकडील 720 रुपये, 4 हजार रुपयांचा मोबाईल व पेन असा चार हजार 725 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला असून.याबाबतची फिर्याद पोलीस नाईक महेश बोडरे यांनी दिली आहे. निलेश राजेंद्र विटकर याच्या विरोधात गुन्हा नोंद झाला असून पुढील तपास पोलीस हवालदार फरांदे करीत आहेत.