
दैनिक स्थैर्य | दि. २६ फेब्रुवारी २०२४ | फलटण |
साहित्यप्रेमी सेवाभावी फाऊंडेशन फलटण, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा फलटण, वनविभाग फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने फलटण येथे मंगळवार, दि. २७ फेब्रुवारी रोजी ‘मराठी राजभाषा गौरव दिन’ साहित्यिक संवाद कार्यक्रम वर्षपूर्ती समारंभ आयोजित करण्यात आला आहे.
हा कार्यक्रम उद्या सायंकाळी ६.०० वाजता होणार असून ‘मुक्त संवाद’ हा विषय ठेवण्यात आला आहे.
या कार्यक्रमास बहुसंख्येने साहित्यप्रेमींसह नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजक, साहित्यिक संवाद कार्यक्रम यांनी केले आहे.