
दैनिक स्थैर्य । दि. १० जून २०२२ । फलटण । कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड ग्रामपंचायतीच्या निर्णयानंतर फलटण तालुक्यातील मुळीकवाडी या गावाने विधवा प्रथा बंदीचा ठराव मंजूर केला आहे.
मुळीकवाडी ग्रामपंचायतीने नुकत्याच झालेल्या मासिक सभेत हा ठराव केला.
सदर ठराव विद्या योगेश कदम यांनी मांडला तर विजयमाला रामदास मुळीक यांनी यास अमुमोदन दिले. यावेळी सदस्यांनी एकमताने ठरावास मंजुरी दिली.
ग्रामपंचायतीच्या ठरावात म्हटले आहे की, आपल्या समाजात पतीच्या निधनावेळी अंत्यविधीच्या वेळी, पत्नीच्या कपाळावरचे कुंकू पुसणे, गळ्यातील मंगळसूत्र तोडणे, हातातील बांगड्या फोडणे, पायातील जोडवी काढणे, तसेच महिलाला विधवा म्हणून कोणत्याही प्रकारचे धार्मिक, सामाजिक कार्यक्रमात सहभागी होता येत नाही. कायद्याने प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जीवन जगण्याचा समान अधिकार आहे.