दोन युवकांची आत्महत्येमुळे शिरवळमध्ये खळबळ

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०४ जून २०२२ । शिरवळ । शिरवळ, ता. खंडाळा गावच्या हद्दीमध्ये एकाच कॉलनीतील दोन युवकांनी आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. यामध्ये शुभम प्रदिप हगवणे (वय 19) व विजय दिलीप माने (वय 22) असे आत्महत्या केलेल्या युवकांचे नाव आहे.

याबाबतची शिरवळ पोलीसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, शिरवळ ता.खंडाळा याठिकाणी सटवाई काँलनी असून त्याठिकाणी शुभम हगवणे व विजय माने हे कुंटूंबियांसमवेत राहण्याकरीता आहे. दरम्यान, शुक्रवार दि.7 मे रोजी सकाळी 7 वाजण्याच्या दरम्यान शुभम हगवणे याने घराच्या समोर असलेल्या पञा शेडच्या लोखंडी अँगलला दोरीने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. यावेळी याबाबतची शिरवळ पोलीसांना माहिती मिळताच तत्काळ शिरवळ पोलीस स्टेशनचे अंमलदार संजय पंडित व शिवराज जाधव यांनी घटनास्थळी धाव घेत उपस्थितांच्या मदतीने मृतदेह रुग्णवाहिकेमधून शिरवळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्र याठिकाणी आणले असता डॉकटरांनी मृत घोषित केले. यावेळी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आल्यानंतर सटवाई काँलनी येथील नागरिक अंत्यविधी उरकून परतले असता दुसऱ्या घटनेमध्ये शुभम हगवणे याच्या घरापासून काही अंतरावर असलेल्या विजय माने यानेही नाँयलाँन दोरीच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. यावेळी याबाबतची माहिती मिळताच तत्काळ घटनास्थळी शिरवळ पोलीस उपनिरीक्षक सतिश आंदेलवार,सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल बारेला, पोलीस अंमलदार सुनिल मोहरे यांनी मृतदेह रुग्णवाहिकेमधून प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आला. यावेळी  एकाच दिवशी दोन मिञांनी गळफास घेत आत्महत्या केल्याने शिरवळ परिसरात खळबळ उडाली आहे.

या घटनेची नोंद शिरवळ पोलीस स्टेशनला आकस्मिक मयत म्हणून झाली असून अधिक तपास पोलीस अंमलदार अरुण भिसे-पाटणकर,संजय पंडित,सुनिल मोहरे हे करीत आहे.


Back to top button
Don`t copy text!