दैनिक स्थैर्य | दि. १४ सप्टेंबर २०२३ | बारामती |
‘दहीहंडी’ म्हणजे सांघिक शक्ती, सुयोग्य संघटन व एकीचे दर्शन असल्याने दहीहंडी भारतीय संस्कृतीची महान व खरी ओळख असल्याचे प्रतिपादन पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी केले.
सहेली फाउंडेशन व राष्ट्रवादी युवती काँगेसच्या बारामती तालुका उपाध्यक्षा रोहिणी आटोळे खरसे व डोर्लेवाडीमधील महिलांच्या वतीने पार्थदादा पवार दहीहंडी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्या हस्ते दहीहंडी महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी सिनेअभिनेत्री जान्हवी किल्लेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, बारामती दूध संघाचे अध्यक्ष पोपटराव गावडे, माजी सरपंच पांडुरंग सलवदे, जयहिंद सेनेचे अध्यक्ष संग्रामसिंह देवकाते, हरिभाऊ आटोळे, अॅड. पंढरीनाथ नाळे, अविनाश काळकुटे, रामभाऊ कालगावकर, अॅड. अतुल भोपळे, अमोल शिंदे, राहुल शिंदे, सुभाष नाळे, गजानन नाळे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रस्त्यावरील दहीहंडी मैदानात आणून त्यास खेळाचे स्वरूप प्राप्त करून ग्रामीण भागातील गोविंदांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी व महिला, मुलींच्या सहभागाने दहीहंडीचे आयोजन केल्याचे आयोजिका रोहिणी खरसे आटोळे यांनी सांगितले.
४५ एकर जमीन त्वरित विकणे आहे
फलटण - सातारा रोडवर मलवडी गावाच्या
रस्त्यालगत, निसर्गरम्य, वीज, पाणी असलेली
प्रदूषणमुक्त ४५ एकर जमीन योग्य किमतींस
त्वरित विकणे आहे.
संपर्क : 8888006611 (WhatsApp)
यावेळी अभिनेत्री जान्हवी किल्लेकर यांनी महिलांशी संवाद साधून महिला व मुलींसोबत नृत्य केले.
गुणवडीच्या जय भवानी दहीहंडी संघाने पाच थर लावून दहीहंडी फोडली. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देण्यात आले.
अनिल सावळे-पाटील यांनी सूत्रसंचालन केले. अजित दळवी यांनी आभार मानले.