दैनिक स्थैर्य | दि. २२ फेब्रुवारी २०२४ | फलटण |
ताथवडा (तालुका फलटण) गावच्या हद्दीत शिपुथा नावच्या शिवारात बोरीच्या झाडाखाली मोकळे जागेत बुधवारी सायंकाळी ५ वाजता तीन पानी जुगार खेळताना फलटण ग्रामीण पोलिसांनी छापा टाकून सुमारे ४ लाख ८१ हजार ५६० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. या ठिकाणी जुगार खेळणार्या सातजणांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
तन्वीर अस्लम पटवेकर (वय २४, रा. ढवळ, ता. फलटण), दीपक बापू जाधव (वय ४१, रा. वाघोशी, ता. फलटण), पोपट संपत तरटे (वय ३९, रा. माळवाडी, ता. फलटण), प्रकाश भानुदास गार्डी (वय ३०, रा. ढवळ, ता. फलटण), मल्हारी नामदेव जाधव (वय २६, ता. फलटण), शेखर तुकाराम थोरात (रा. ढवळ, ता. फलटण) व नाना मसुगडे (रा. ढवळ, ता. फलटण) या सातजणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
यावेळी पोलिसांनी रोख रूपये ९५०, एक होंडा कंपनीची मोटारसायकल (क्र. एमएच११सीएस८३६६) अंदाजे किंमत १,२०,०००/-, एक हिरो होंडा कंपनीची काळी रंगाची स्प्लेंडर मोटरसायकल (क्र. एमएच ११ एएम २८६६) अंदाजे किंमत ८०,०००/-, एक हिरो कंपनीची काळी रंगाची स्प्लेंडर मोटरसायकल (क्र. एमएच ११ सीझेड १६४०) अंदाजे किंमत ८०,०००/-, एक होंडा कंपनीची काळी रंगाची शाईन मोटरसायकल तीस (नंबर नसलेली) अंदाजे किंमत १,१०,०००/-, व एक हिरो कंपनीची काळी रंगाची स्प्लेंडर मोटरसायकल (एमएच ११ डीसी ९५४०) अंदाजे किंमत ९०,०००/-, असा एकूण ४,८१,५६०/- मुद्देमाल जुगाराच्या ठिकाणाहून जप्त केला.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आँचल दलाल, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील महाडिक, पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने, पोलीस हवालदार नितीन चतुरे, पोलीस अंमलदार अमोल जगदाळे, तात्या कदम, नितीन खरात, दडस यांनी केली.
या प्रकरणाचा अधिक तपास पो. ना. पवार करत आहेत.