
दैनिक स्थैर्य । दि. ०३ जून २०२२ । खटाव । खटाव तालुक्याचे तहसीलदार किरण जमदाडे यांनी राजपथ इन्फ्राकॉन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची जप्त करण्यात आलेली वाहने दंडात्मक रक्कम वसूल न करता व उपविभागीय अधिकारी दहिवडी यांच्या कार्यालयाचे कोणतेही लेखी आदेश न घेता मनमानी कारभार करत सोडून दिलेले वाहने पुन्हा जप्त करण्याचे आदेश प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी यांनी काढले आहेत.
राजपूत इन्फ्राकॉन प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी गोपुज तालुका खटाव या ठिकाणी दगड व मुरूम उत्खनन करण्याचे काम करत होती. परंतु अवैध उत्खनन करत असल्याचे महसूल महसूल विभागाच्या लक्षात आल्यानंतर महसूल विभागाने कारवाई करत सदर कंपनीची नऊ वाहने जप्त करून औंध पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये लावण्यात आली होती. आणि महसूल प्रशासनाने 6 कोटी 93 लाख रुपये दंडात्मक आदेश केला होता. परंतु खटाव तहसीलदार यांनी प्रांत अधिकारी यांच्या अधिकारावर अतिक्रमण करत सदर वाहने सोडण्याचे आदेश औंध पोलीस स्टेशन यांना लेखी स्वरूपात दिले.
तरी उपविभागीय अधिकारी शैलेश सूर्यवंशी यांनी आज खटाव तहसीलदार यांना आदेश पारित केला आहे की. सदर वाहने कोणत्या कायद्याच्या आधारे सोडण्यात आली. सदर वाहने सोडण्याबाबतची कोणतीही परवानगीउपविभागीय अधिकारी कार्यालय दहिवडी यांची घेतलेली दिसून येत नाही. तरी आपण सदर वाहने सोडण्याचे आदेश चुकीचा आहे. तरी सोडलेली वाहने येत्या दहा दिवसांमध्ये जप्त करून दंड वसुली करावी असा आदेश करण्यात आला.तसेच सदरची वाहने तहसीलदार यांनी कशाच्या आधारे सोडली याबाबतीत दहा दिवसांच्या आतमध्ये खुलासा सादर करण्याचे सांगण्यात आले आहे.