दैनिक स्थैर्य । दि. ३० मे २०२२ । मुंबई । भारतातील आघाडीच्या एकात्मिक पुरवठा साखळी व लॉजिस्टिक्स सोल्यूशन्स प्रदाता कंपनी ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (टीसीआय)ने आज ३१ मार्च २०२२ रोजी समाप्त झालेल्या आर्थिक वर्षासाठी त्यांच्या एकत्रित आर्थिक निष्पत्तींची घोषणा केली. कंपनीच्या या वर्षासाठी एकूण महसूलामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत १८.५ टक्क्यांची वाढ झाली, तर याच कालावधीमध्ये नफ्यामध्ये ९८ टक्क्यांची वाढ झाली. कंपनीने प्रतिशेअर २ रूपयांचा अंतिम लाभांश आणि दर्शनी मूल्यावर १०० टक्के पेआऊटची देखील घोषणा केली.
टीसीआयचा कार्यसंचालनांमधून महसूल वार्षिक १८.५ टक्क्यांच्या वाढीसह २९०५ कोटी रूपयांपर्यंत पोहोचला. ईबीआयटीडीए आर्थिक वर्ष २०२१ मधील २८३ कोटी रूपयांच्या तुलनेत ४२१ कोटी रूपयांपर्यंत पोहोचला. ईबीआयटीडीए मार्जिन आर्थिक वर्ष २०२१ मधील ११.४ टक्क्यांच्या तुलनेत १४.४ टक्क्यांपर्यंत पोहोचले. कंपनीचा कर पश्चात नफा आर्थिक वर्ष २०२१ मधील १३५ कोटी रूपयांच्या तुलनेत ९८ टक्क्यांनी वाढून २६७ कोटी रूपयांर्यंत पोहोचला. तर कर पश्चात मार्जिन आर्थिक वर्ष २०२१ मधील ५.४ टक्क्यांच्या तुलनेत ९.१ टक्क्यांपर्यंत पोहोचले.
एकत्रित कामगिरीमधील ठळक बाबी:
टीसीआयचा कार्यसंचालनांमधून महसूल वार्षिक १६.२ टक्क्यांच्या वाढीसह ३२५७ कोटी रूपयांपर्यंत पोहोचला. ईबीआयटीडीए आर्थिक वर्ष २०२१ मधील ३०७ कोटी रूपयांच्या तुलनेत ४५६ कोटी रूपयांपर्यंत पोहोचला. ईबीआयटीडीए मार्जिन आर्थिक वर्ष २०२१ मधील १०.८ टक्क्यांच्या तुलनेत १३.९ टक्क्यांपर्यंत पोहोचली. कंपनीचा कर पश्चात नफा आर्थिक वर्ष २०२१ मधील १५० कोटी रूपयांच्या तुलनेत ९४.७ टक्क्यांनी वाढून २९३ कोटी रूपयांपर्यंत पोहोचला. तर कंपनीचे कर पश्चात पीएटी मार्जिन आर्थिक वर्ष २०२१ मधील ५.३ टक्क्यांच्या तुलनेत ८.९ टक्क्यांपर्यंत पोहोचले.
टीसीआयचे व्यवस्थापकीय संचालक श्री. विनीत अग्रवाल म्हणाले, “कोविडच्या दुसऱ्या लाटेच्या परिणामानंतर देखील चौथी तिमाही आणि संपूर्ण आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये उद्योगव्यापी सप्लाय चेन डिसरप्शन्स टॉप लाइन आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मार्जिन्सच्या बाबतीत चांगले राहिले आहेत. सर्व सेवा क्षेत्रे विकासाच्या दिशेने वाटचाल करत असल्यामुळे महसूल व मार्जिन्स आतापर्यंतचे सर्वोच्च आहेत. यासाठी प्रमुख कारण म्हणजे टीसीआयने ग्राहकांवर लक्ष केंद्रित करण्याच्या मुलभूत व्यवसाय तत्त्वांचे पालन केले आहे.”