दैनिक स्थैर्य । दि. ०३ जून २०२२ । फलटण । केंद्रीय जल जीवन मिशन अंतर्गत घरघर जल ही केंद्र शासनाची महत्त्वपूर्ण योजना देशभर कार्यान्वित होत असून मौजे दऱ्याचीवाडी, ता. फलटण या डोंगर दऱ्यातील गावामध्ये नुकताच या योजनेच्या कामाचा शुभारंभ सातारा जिल्हा परिषद व जिल्हा नियोजन समितीच्या माजी सदस्या ॲड. सौ. जिजामाला नाईक निंबाळकर यांच्या हस्ते समारंभ पूर्वक करण्यात आला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीतून जल जीवन मिशन अंतर्गत घरघर जल महत्त्वपूर्ण योजना देशात राबविण्यात येत असून या योजनेद्वारे प्रत्येक घरात स्वच्छ पिण्याचे पाणी पोहोचविले जात आहे. माढा लोकसभा मतदार संघाचे लोकप्रतिनिधी भाजपा खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर केंद्रीय जल जीवन मिशन समिती सदस्य असल्याने त्यांच्या माध्यमातून फलटण तालुक्यातील वाड्या वस्त्यांवर नळा द्वारे प्रत्येक कुटुंबाला पिण्याचे स्वच्छ पाणी उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न असल्याचे अड. सौ. जिजामाला नाईक निंबाळकर यांनी निदर्शनास आणून दिले आहे.
मौजे दऱ्याचीवाडी, ता. फलटण सारख्या डोंगर दऱ्यातील गावामध्ये आज या योजनेच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला असून ४२ लाख रुपये खर्चाच्या या योजनेत विहीर खोदणे, रिंग करणे, पंप हाऊस बांधणे, सुमारे २ की. मी. पाईप लाईन वगैरे कामाचा अंतर्भाव पहिल्या टप्प्यात करण्यात आला आहे. लवकरच सदर कामे पूर्ण करुन प्रत्यक्ष पाणी पुरवठा सुरु करण्यासाठी आपला पाठपुरावा सुरु राहणार असल्याचे अड. सौ. जिजामाला नाईक निंबाळकर यांनी सांगितले.
ॲड. सौ. जिजामाला नाईक निंबाळकर म्हणाल्या, दऱ्याचीवाडी गावातील महिला, पुरुष यांना पिण्याच्या पाण्यासाठी खूप दूरवर प पायपीट करावी लागत होती, त्यांची पायपीट दूर करण्यासाठी सदर योजना मंजूर करुन आणून प्रत्यक्ष काम सुरु होत असून लवकरच पाण्यासाठीची पायपीट टळेल याची ग्वाही त्यांनी दिली आहे.
यावेळी स्वराज नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन अमरसिंह नाईक निंबाळकर, सरपंच सौ. गीतांजली कुमकले, ग्रामपंचायत सदस्य रुपेश शिंदे, शिवाजी ढेंबरे, सौ. साधना ढेंबरे, माजी सरपंच हनुमंत जाधव यांच्या ग्रामस्थ उपस्थित होते.