स्थैर्य, दि.४: चिनी अब्जाधीश आणि जगातील तिसरे श्रीमंत व्यक्ती अलिबाबा समूहाचे मालक जॅक मा हे गेल्या दोन महिन्यांपासून बेपत्ता आहेत. जॅक मा यांनी ऑक्टोबरमध्ये शांघाय येथाव भाषणात चीनच्या ‘व्याज धारक’ आर्थिक नियामक आणि सरकारी बँकांवर कडक टीका केली होती. त्यानंतर चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशीही त्यांचा वाद झाला. यानंतर मागील दोन महिन्यांपासून ते बेपत्ता आहेत.
जॅक मा यांनी चिनी सरकारला आवाहन केले होते की, यंत्रणेत असा बदल करा की, व्यवसायात नवीन गोष्टी सुरू करण्याच्या प्रयत्नाला दडपण्याचा प्रयत्न झाला नाही पाहिजे. जागतिक बँकिंगच्या नियमांना त्यांनी ‘वृद्धांचा क्लब’ असे संबोधले होते. या भाषणानंतर चीनमधील सत्ताधारी पक्ष भडकला होता. जॅक मा यांच्या टीकेला कम्युनिस्ट पार्टीवरील हल्ल्याच्या रूपात घेतले होते.