
सातारा – छत्रपती कृषी महोत्सवाचे उद्घाटन करताना श्री .छ.सौ .दमयंतीराजे भोसले. त्यावेळी सोमनाथ शेटे, सौ. रेखा शेटे, सौ. आंबेकर, पंकज चव्हाण, राजन माने व इतर मान्यवर.
स्थैर्य, सातारा, दि. 21 नोव्हेंबर : येथील जिल्हा परिषद मैदानावर स्मार्ट एक्सपो च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या छत्रपती कृषी महोत्सव 2025 हे खर्या अर्थाने राज्यातील शेतकरी बंधू तसेच सामान्य नागरिकांसाठी एक पर्वणी असून गेली चार वेळेस सातारा येथे या महोत्सवाच्या आयोजनाला अतिशय चांगला प्रतिसाद लाभत आहे. असाच या छत्रपती कृषी महोत्सव प्रदर्शनाचा सातारा पॅटर्न राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये आयोजित व्हावा व त्यासाठी मी मनापासून या उपक्रमास शुभेच्छा देते असे उद्गार श्री. छ. सौ. दमयंती राजे भोसले यांनी काढले. छत्रपती कृषी महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी श्री.छ. सौ दमयंतीराजे भोसले यांचे हस्ते फीत कापून या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या.
त्यानंतर महोत्सवातील सुमारे 200 दालनाची पाहणी करून त्यांनी या प्रदर्शनात विशेषत्वाने सादर करण्यात आलेली गिनीज बुकातील नोंद झालेली सर्वात बुटकी असलेली दोन फूट आठ उंचीच्या राधा नावाच्या म्हशीची ही पाहणी करून बोराटे परिवाराला शुभेच्छा दिल्या. यावेळी श्री.छ.सौ.दमयंतीराजे भोसले यांचे विविध स्टॉलवर स्टॉलधारकांनी पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन स्वागत केले. याप्रसंगी स्मार्ट एक्स्पोचे संयोजक सोमनाथ शेटे सौ. रेखा शेटे, सौ .आंबेकर, पंकज चव्हाण सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी व्यवस्थापक राजन माने यांचे सह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रदर्शनाला सातारा जिल्ह्यातूनच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रातून मोठा प्रतिसाद लाभत असून प्रदर्शनाच्या उद्घाटन सत्रापूर्वी या महोत्सवाला हजारो नागरिकांनी भेट देऊन या उत्कृष्ट संयोजनाचे कौतुक केले असल्याची माहिती यावेळी सोमनाथ शेटे यांनी दिली .
या प्रदर्शनात प्रात्यक्षिक व शेतकरी बांधवांना फवारणी क्षेत्रातील नवीन उद्योग करण्यासाठी उपयुक्त असा ड्रोन चे दालन येथे उपलब्ध आहे तसेचशेतीमधील विविध तंत्रज्ञानाची माहिती देणारी दालने व प्रात्यक्षिक, सेंद्रिय शेतीचे विशेष दालन प्रात्यक्षिक, भाजीपाला रोपवाटिका व विविध दुर्मिळ अशा प्रजातीचे दालन या प्रदर्शनात आहे . याशिवायहायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानाचे लाईव्ह प्रात्यक्षिक पाहायला मिळत असून दुर्मिळ देशी 500 हुन बियाण्यांचे प्रदर्शन व विक्री येथे उपलब्ध करण्यात आली आहे .कृषी महोत्सव म्हणून परदेशी भाजीपाला प्रदर्शन ,शेतीविषयक पुस्तकाचे दालन,तज्ञ मान्यवरांची व्याख्याने, नवीन तंत्रज्ञान सौर ऊर्जा विषयी दालने माहिती व प्रदर्शन
तसेच गृहोपयोगी वस्तूचे भव्य दालन येथे उपलब्ध करण्यात आले आहे.
या प्रदर्शनामध्ये शुक्रवार दि. 21 नोव्हेंबर रोजी डॉग आणि कॅट प्रेमी साठी डॉग आणि कॅट शो चे आयोजन सकाळी दहा ते सहा या वेळेत केले असून आणि फॅन्सी ड्रेस कॉम्प्टेशन संपन्न होणार आहे ,अशी माहिती सोमनाथ शेटे यांनी दिली.

