कर्मचाऱ्यांचा विजय हाच माझा विजय होय : नानासाहेब थोरात

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १० जून २०२२ । बारामती । कर्मचारी व त्यांचे कुटूंब आयुष्भर सुखी राहावे म्हणून त्यांच्या हितासाठी जीवनभर कटिबद्ध राहू असे प्रतिपादन श्रायबर डायनॅमिक्स डेअरी एम्प्लॉईज युनियन चे अध्यक्ष नानासाहेब थोरात यांनी केले.

श्रायबर डायनॅमिक्स कर्मचाऱ्यांच्या वतीने कामगार नेते नानासाहेब थोरात यांच्या वाढदिवसा निमित्त आयोजित कामगार मेळाव्यात नानासाहेब थोरात बोलत होते या प्रसंगी तालुक्यातील अनाथ आश्रमातील विध्यार्त्याना वह्या वाटप करण्यात आले व आरोग्य शिबीर मध्ये दोनशे कर्मचाऱ्याची विविध आजारांची तपासणी करण्यात आली.

या प्रसंगी राष्ट्रवादी महाराष्ट्र प्रदेश कामगार सेल अध्यक्ष शिवाजीभाऊ खटकाळे व पियाजो कामगार संघटना प्रतिनिधी तानाजी खराडे, तुकाराम चौधर, सुयश ऑटो चे भारत नाना जाधव, पोपट घुले, आयएसएमटी कंपनी चे कल्याण कदम व गुरुदेव सरोदे, भारत फोर्ज चे राहुल बाबर व भोईटे, फेरेरो इंडियाचे नाना बाबर व पवार, बारामती दूध संघाचे राहुल देवकाते व प्रकाश काटे, कोलमन कंपनीचे अध्यक्ष नाना रणवरे व विविध कंपन्यांचे कामगार प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्तित होते.

कामगारांचे प्रश्न सोडवत असताना कामगारांनी दिलेली खंबीर साथ या मुळे आतापर्यंत यशस्वी झालो अडचणीच्या व कठीण काळात फायदा तोटा चा विचार न करता कामगार एका हाकेत पाठीशी उभे राहतात हीच कमावलेली पुण्याई आहे असेही थोरात यांनी सांगितले
कामगार क्षेत्रात सरकार बदलले की धोरणे बदलतात परंतु नानासाहेब कामगारांसाठी कधीही बदलले नाहीत या गुणामुळे ते ‘कामगार नेते ‘झाले असे शिवाजीराव खटकाळे यांनी सांगितले.

श्रायबर डायनॅमिक्स डेअरी एमलाइज युनियन चे उपाध्यक्ष हनुमंत कोकरे, कार्याध्यक्ष राजेंद्र काकडे, सरचिटणीस गजानन भुजबळ, खजिनदार गणेश जगताप,कार्यकारणी सदस्य तुळशीदास मोरे, ओंकार दुबे, गुलाब पठाण आदींनी सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम केले.


Back to top button
Don`t copy text!