करंजेपेठेतील घरफोडी प्रयत्न केल्याप्रकरणी दोन सराईत जेरबंद; शाहुपूरी गुन्हे प्रकटीकरण शाखेची कारवाई

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०९ जून २०२२ । सातारा । करंजेपेठ सातारा येथील एका घरात घरफोडीचा प्रयत्न झाला होता. याप्रकरणी शाहुपुरी प्रकटीकरणने दोनजणांना जेरबंद करण्यात यश आले आहे. बशीर वली शेख वय 24 व ईश्वर सुनील भोरे वय 19 दोन्ही रा. आकाशवाणी झोपडपट्टी सातारा अशी त्यांची नवे असून दोघेही पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून यापूर्वीही त्यांच्या नावावर गुन्हे दाखल आहेत.

याबाबत माहिती अशी, करंजेपेठ सातारा येथील एका घरात 05 रोजी रात्री 3.30 वा. घरफोडी चोरी करण्याचा प्रयत्न प्रयत्न झाला होता. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दि. तक्रार होऊन गुन्हा झाला होता. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने घटनास्थळी भेट देवून आजुबाजुचे CCTV फुटेजची पाहणी केली. त्यामध्ये तीन संशयीत इसम दिसून आले. या CCTV फुटेजच्या आधारे संशयीत इसमाचा शोध घेत असताना दि. 06/6/2022 रोजी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार यांना माहिती मिळाली को संशयित तोन इसम आकाशवाणी झोपडपट्टीमध्ये राहणारे असून ते आकाशवाणी झोपडपट्टीचे पाठीमागे ओढयाचे कडेला बसलेले आहेत. हि माहिती मिळाल्याने गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस तात्काळ सदर ठिकाणी गेले. त्यांना पाहुन संशयीत पळून जावु लागले. पोलिसांनी आरोपींचा पाठलाग करून एकाला पकडले. त्याठिकाणी त्यांची मोटार सायकल ताब्यात घेण्यात आली. संशयीत इसमाकडे गुन्हयाबाबत कसून चौकशी केली असता त्याने नमुद गुन्हयाची कबुली दिली. तसेच साथीदारांचे बाबत माहिती दिली. त्यानंतर दि. 07 रोजी उर्वरीत संशयीत इसमाचा शोध घेत असताना गुन्हयातील दुसरा संशयीत इसमास पकडण्यात गुन्हे शाखेच्या अंमलदारांना यश आले आहे.

अशा प्रकारे गुन्हे प्रकटीकरण शाखेने सदर गुन्हयाचा सलग तपास करून आरोपी बाबत गोपनिय माहिती प्राप्त करुन घरफोडी चोरीचा गुन्हा उघडकीस आणून गुन्हयातील दोन सराईत आरोपीना जेरबंद केले आहे. तसेच त्यांचेकडून गुन्हा करणेसाठी वापरलेली मोटार सायकल हस्तगत केली आहे. गुन्हे प्रकटीकरण शाखेने सदरचा घरफोडी चोरीचे प्रयत्नाचा गुन्हा घडले पासुन 24 तासाचे आत उघडकीस आणला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास महिला पोलीस हवालदार अतुला तावरे ह्या करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोन्हाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय पतंगे, सहा. पोलीस निरीक्षक अभिजीत यादव, पोलीस हेडकॉन्स्टेबल हसन तडवी, लैलेश फडतरे, पोलीस नाईक अमित माने, स्वप्निल कुंभार, ओंकार यादव, पो.कॉ. सचिन स्वप्निल सावंत यांनी केली आहे.


Back to top button
Don`t copy text!