दैनिक स्थैर्य । दि. ०८ जून २०२२ । सातारा । सातारा शहरालगतच्या औद्योगिक वसाहतीमध्ये बॅटरी चोरणाऱ्या एका अट्टल गुन्हेगाराला सातारा शहर पोलिसांनी कौशल्याने अटक केली. सुनील सुखदेव वाघमारे ( वय23 राहणार प्रतापसिंह नगर ) असे अटक केलेल्याचे नाव आहे त्याच्याकडून नऊ बॅटऱ्या व मोटार सायकल जप्त करण्यात आली .
यासंदर्भात शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार सातारा शहर आणि एमआयडीसी परिसरामध्ये सातत्याने वाहनांच्या बॅटर्यांची चोरी होत असल्याच्या तक्रारी शहर पोलिसांना प्राप्त झाल्या होत्या . त्यानुसार पोलीस पेट्रोलिंग च्या माध्यमातून संबंधित चोराचा शोध घेत होते निंबाळकर यांना आपल्या गोपनीय खबऱ्याकडून बॅटरी चोरणाऱ्या युवकांची माहिती मिळाली होती त्या अनुषंगाने गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने एमआयडीसी परिसरात पेट्रोलिंग दरम्यान एका संशयित फिरणारा युवकाला ताब्यात घेतले . त्याच्याकडे कसून चौकशी केली असता तो आणि त्याचा एक साथीदार चोरी करीत असल्याची कबुली वाघमारे यांने दिली.
त्याच्याकडून 9 बॅटऱ्या आणि चोरी करता वापरलेली मोटरसायकल असा एक लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे . वाघमारे याच्या दुसऱ्या साथीदाराचा शोध सुरू आहे .या कारवाईमध्ये पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांच्या मार्गदर्शनात अंतर्गत उपनिरीक्षक सुधीर मोरे हवालदार सुजित भोसले अविनाश चव्हाण ज्योतीराम पवार पदाने अभय साबळे विक्रम माने संतोष कचरे गणेश घाडगे गणेश भाऊ सागर गायकवाड दीपक गुरव दीपक इंगवले अरुण काकडे यांनी कारवाईत भाग घेतला होता.