दैनिक स्थैर्य । दि. ०७ जून २०२२ । मुंबई । फिनटेक कंपनी एंजल वन लिमिटेडने (पूर्वीची एंजल ब्रोकिंग लिमिटेड) मे २०२२ मध्ये व्यवसाय घटकांमध्ये प्रबळ कामगिरीची नोंद करणे सुरूच ठेवले. कंपनीने मे महिन्यामध्ये आपल्या ग्राहकांची आकडेवारी १०८.७ टक्क्यांच्या वार्षिक वाढीसह १०.१० दशलक्षांपर्यंत नेत लक्षणीय उपलब्धी संपादित केली. या महिन्यासाठी एकूण ग्राहक संपादन १०.२ टक्क्यांच्या वार्षिक वाढीसह ०.४७ दशलक्ष होते, ज्यामधून सातत्यपूर्ण विकासगती दिसून येते.
फिनटेक कंपनीने मे २०२२ मध्ये ४८.४ टक्क्यांच्या वार्षिक वाढीसह ७०.६३ दशलक्ष ऑर्डर्सची प्रक्रिया केली. कंपनीने इतर क्षेत्रांमध्ये देखील प्रभावी आकडेवारीची नोंद केली, जेथे मे २०२२ मध्ये अॅव्हरेज डेअरी टर्नओव्हर (एडीटीओ) वार्षिक ८८.२ टक्क्यांच्या वाढीसह ८.९४ ट्रिलियन रूपयांपर्यंत पोहोचले. एंजल वनचे सरासरी क्लायण्ट फंडिंग बुक ६०.४ टक्क्यांच्या वार्षिक वाढीसह १८.८४ बिलियन रूपयांपर्यंत पोहोचले.
एंजल वन लिमिटेडचे चीफ ग्रोथ ऑफिसर श्री. प्रभाकर तिवारी म्हणाले, “आमचा अधिकाधिक ग्राहकांना गुंतवणूक सोल्यूशन्स उपलब्ध करून देण्याचा उद्देश आहे. उद्योगामधील काही महिन्यांमध्येच १० दशलक्ष ग्राहकांचा टप्पा गाठण्यापर्यंत प्रवास अत्यंत उत्साहवर्धक राहिला आहे. एंजल वनचा नेहमीच ग्राहकांना दर्जात्मक उत्पादने व सेवा देण्याचा मनसुबा आहे, ज्यामधून प्रबळ संपत्ती निर्मितीची खात्री मिळते. आम्हाला आनंद होत आहे की, आम्ही देशातील अनेक व्यक्तींसाठी गुंततवणूका सुलभ करत आहोत.”
एंजल वन लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. नारायण गंगाधर म्हणाले, “आ` व्यवसाय घटकांमध्ये प्रगती करत आहोत आणि आमच्या तंत्रज्ञानदृष्ट्या प्रगत उत्पादनांमुळेच हे शक्य झाले आहे. मला आमच्या ग्राहकांनी आमच्यावर दाखवलेल्या विश्वासासाठी खूप आनंद होत आहे, जेथे आम्ही त्यांच्या संपत्ती निर्माण करण्याच्या प्रवासामध्ये त्यांच्यासोबत सहयोग करतो. अधिक पुढे जात आम्ही अधिकाधिक ग्राहकांना सेवा देण्यास उत्सुक आहोत, जेथे आम्ही बाजारपेठ नेतृत्व संपादित करण्याचे ध्येय स्थापित केले आहे. आमचा सतत सुधारणा करण्याचा आणि ग्राहकांना सर्वात लाभदायी सोल्यूशन्स देण्याचा प्रयत्न आहे.”
एंजल वन भारतभरातील, तसेच द्वितीय व तृतीय श्रेणीच्या आणि त्यापलीकडील शहरांमधील व्यक्तींना भांडवल बाजारपेठ उपलब्ध करून देत तिचे लोकशाहीकरण करत आहे. गुंतवणूक अधिक सुलभ करण्यासाठी कंपनीने नुकतेच मर्यादित युजर्सकरिता त्यांचे सुपर अॅप लाँच केले. एंजल वन सुपर अॅप हे साधेपणा, विश्वसनीयता, उपलब्धता, सुलभता व पादर्शकता या तत्त्वांवर निर्माण करण्यात आलेले प्रबळ वेब व मोबाइल व्यासपीठ आहे.