अलेग्रिया नृत्य अकादमीचे बहारदार कथ्थक आणि लक्ष्मी राजगोपालन यांचे शास्त्रीय गायन

शुक्रवार, दि. 13 फेब्रुवारी रोजी पुणे येथील नंदिता कुलकर्णी व सहकलाकारांची कथक नृत्य सेवा


 सातारा : कथक नृत्य सादर करताना मानसी सदामते व सहकलाकार. (छाया – अतुल देशपांडे, सातारा) 

स्थैर्य, 12 फेब्रुवारी, सातारा : येथील श्री उत्तर चिदंबरम नटराज मंदिर ट्रस्ट आयोजित महाशिवरात्री संगीत व नृत्य महोत्सवात बुधवारी सायंकाळी सातारा येथील स्थानिक कलाकार मानसी सदामते व त्यांच्या सहकार्‍यांनी अलेग्रिया नृत्यकादमीच्या वतीने बहारदार असे कथक नृत्य सादर केले .या कार्यक्रमात त्यांनी शिवस्तुती ,त्रिताल चे कथक सादर करून विष्णुवंदना, सरस्वती वंदना यांचे सुरेख सादरीकरण केले. शिवतांडव नृत्य आणि या कार्यक्रमाची सांगता झाली. गुरु मानसी सदामते यांचे सोबत त्यांच्या शिष्या मानसी चव्हाण ,नमिता भिडे ,कविता शिवकुमार, ज्योती चिल्लाळे, श्रेया खटावकर आदी विद्यार्थिनींनी बहारदार कथक प्रकारची नृत्य सादर करून पदलालित्य आणि अभिनय याचे सुरेख दर्शन घडविले. या कार्यक्रमानंतर उत्तरार्धात लक्ष्मी राजगोपालन यांनी अतिशय सुरेख असे शास्त्रीय गायन सादर केले .यावेळी लक्ष्मी यांनी ..वातापी गणपती.. ही हंसध्वनी रागातील रचना सादर केली .त्यानंतर अभोगी रागातील ..सभापतीकु ..आणि ..महादेव शिवशंभो.. रेवती रागात सादर केले. ..मार्गबंधु स्तोत्र.. सादर करून.. सांब गिरीश ..भजन सादर करून.. शिवा शिवा शंभो.. सादर करून नदन नामक्रिय रागात सादर केले. भजरे गुरुनाथ ..हे पिल्लू रागात अतिशय सुरेखपणे आळवत आपल्या या गायन सेवेची सांगता केली. मृदुंग वर शशांक यांनी तर व्हायोलिन वर कृष्णन नटराजन यांनी सुरेख साथ लक्ष्मी यांना केली.

कार्यक्रम प्रसंगी वासुदेव नायर,मंदिराचे व्यवस्थापक चंद्रन,नारायण राव यांचे सह सातारा परिसरातील अनेक नृत्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते .या सर्व कलाकारांचा सत्कार मंदिराच्या वतीने सुहास शहाणे,सौ.कांचन शहाणे,सौ.शैलजा व सौ.उषा शानभाग यांच्या हस्ते करण्यात आला .या नृत्य सादरीकरणाचे वेळीच सातारा शहरातील द्वारका अकादमीच्या विविध विद्यार्थ्यांनी भगवान शंकर व नटराज यावर आधारित चित्रे रेखाटली . या सर्व चित्रकारांचाही सत्कार यावेळी नटराज मंदिर ट्रस्टच्या वतीने करण्यात आला.

दरम्यान, शुक्रवार, दि. 13 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता पुणे येथील नंदिता कुलकर्णी व सहकलाकारांची कथक नृत्य सेवा सादर होणार आहे.कथक नृत्याच्या शास्त्रशुद्ध परंपरेचा आणि भाव समृद्ध अभिव्यक्तीचा सुरेल आविष्कार सादर करणारा ‘नृत्यपुष्प’ हा विशेष नृत्यकार्यक्रम 13 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 6 ते 8 या वेळेत नटराज उत्तम चिदंबरम मंदिर, सातारा येथे आयोजित करण्यात आला आहे. कथक नृत्यांगना व गुरु नंदिता देशपांडे-कुलकर्णी सातारा व पुणे येथील 22 शिष्यांसह या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. कथक विषयात एम.ए. व आलंकार प्राप्त निवेदिता देशपांडे आणि अंकिता कुलकर्णी यांचा विशेष सहभाग लाभणार आहे. प्रारंभिक, मध्यम व प्रगत स्तरावरील विद्यार्थ्यांचे सादरीकरण, तसेच श्रीकृष्ण व नटेश्वरावर आधारित भक्तिरसपूर्ण रचना हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य ठरणार आहे.

गुरु नंदिता देशपांडे-कुलकर्णी यांनी कथक नृत्याचे एम.एस. व अलंकार शिक्षण सोलापूर येथील नामवंत गुरु मनीषा जोशी यांच्याकडून पूर्ण केले आहे. विविध कथक नृत्यस्पर्धांमध्ये त्यांनी अनेक पारितोषिके व प्रमाणपत्रे प्राप्त केली असून, ‘कथक प्रवाह’, ‘मन एक निशब्द साद’, ‘नृत्यचक्र’ यांसारख्या महत्त्वपूर्ण प्रकल्पांमध्ये त्यांनी सहभाग नोंदविला आहे. पुणे येथे साकार झालेल्या 1500 कथक नर्तकांच्या सहभाग असलेल्या ‘नृत्यचक्र’ या भव्य प्रकल्पात त्यांनी सहभाग घेतला असून, या उपक्रमाचा लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद होण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.सध्या त्या सातारा तसेच पुणे शहरातील दोन केंद्रांमध्ये कथक नृत्य वर्ग यशस्वीपणे चालवत असून,अनेक विद्यार्थ्यांना कथक कलेचे संस्कार देत आहेत.कथक रसिकांनी या अभिजात नृत्यपर्वाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.


Back to top button
Don`t copy text!