मनोज जाधव व अवधूत वेल्हाळ यांना राज्याच्या ग्रामविकास विभागाचा गुणवंत अधिकारी व कर्मचारी पुरस्कार जाहीर


दैनिक स्थैर्य | दि. २३ फेब्रुवारी २०२४ | फलटण |
सातारा जिल्हा परिषेदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे तत्कालीन उपमुख्य कार्यकारी अधिकारी व अकोला ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक श्री. मनोज जाधव व सातारा जिल्हा परिषदेचे कनिष्ठ सहाय्यक श्री. अवधूत वेल्हाळ यांना राज्याच्या ग्रामविकास विभागाचा गुणवंत अधिकारी व कर्मचारी पुरस्कार जाहीर झाला आहे.

गुणवंत पुरस्कार मिळाल्याबद्दल मनोज जाधव व अवधूत वेल्हाळ यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असून राजकीय क्षेत्राबरोबरच, ग्रामविकास विभागातील त्यांचे सहकारी मित्र, अधिकारी यांच्यासह फलटणच्या राजे ग्रुपने त्यांचे अभिनंदन केले आहे.


Back to top button
Don`t copy text!