दैनिक स्थैर्य | दि. २३ फेब्रुवारी २०२४ | फलटण |
गिरवी (ता. फलटण) गावचे सुपुत्र व कुरोली फूड्स, कोळकी (ता. फलटण) चे संचालक, तसेच सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. साताराचे यशवंत कृषी मंच अध्यक्ष, शेतीतज्ज्ञ, कृषीरत्न श्री. रामदास भुजंगराव कदम यांना महाराष्ट्र शासनाचा ‘उद्यान पंडित’ पुरस्कार जाहीर झाला आहे.
हा पुरस्कार मिळाल्याबद्दल रामदास कदम यांचे फलटणच्या राजे ग्रुपकडून अभिनंदन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या कृषी, पशूसंवर्धन, दुग्धव्यवसाय विभाग, मत्स्यव्यवसाय विभाग यांच्या वतीने कृषी, कृषी संलग्न क्षेत्र तसेच फलोत्पादन क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणार्या व्यक्ती/संस्था यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते.