ऋतुजा गाटे हिला खेलो इंडिया तिरंदाजी स्पर्धेत ‘ब्राँझ मेडल’

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. २३ फेब्रुवारी २०२४ | फलटण |
फलटणची सुकन्या कु. ऋतुजा विनय गाटे हिने मिझोराम राज्याच्या शिलाँग येथे पार पडलेल्या ‘तिरंदाजी युनिव्हर्सिटी खेलो इंडिया’ गेममध्ये कंपाउंड मिक्स प्रकारामध्ये ब्राँझ मेडल मिळविले.

सध्या कु. ऋतुजा ही विद्या प्रतिष्ठान, बारामती येथे ‘बीसीए’चे शिक्षण घेत असून तिने स्कूल नॅशनलमध्ये ब्राँझ मेडल, महाराष्ट्र ऑलिम्पिकमध्ये गोल्ड, युनिव्हर्सिटी झोनलमध्ये गोल्ड मेडल मिळविले आहे. तिला शिवछत्रपती पुरस्कार विजेते आंतरराष्ट्रीय कोच चंद्रकांत इलग (बुलढाणा) व सूरज ढेंबरे (फलटण) यांचे मार्गदर्शन लाभले.

कु. ऋतुजा हिचे आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आमदार दिपकराव चव्हाण, श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत सत्यजितराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर यांनी अभिनंदन केले आहे.


Back to top button
Don`t copy text!