स्थैर्य,दि ७: व्हॉट्सअपने आजपासून देशात आपली पेमेंट सर्व्हिस सुरू केली आहे. कंपनीने एक ब्लॉग पोस्टच्या माध्यमातून ही माहिती दिली. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने गुरुवारी संध्याकाळी व्हॉट्सअपला UPI बेस्ड पेमेंट सर्व्हिस सुरू करण्यास मंजूरी दिली आहे. व्हॉट्सअप फेसबुकची सब्सिडियरी कंपनी आहे.
10 प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध असणार पेमेंट सर्व्हिस
NPCI ची मंजूरी मिळाल्यानंतर फेसबुकच्या CEO मार्क झुकेरबर्गने एक व्हिडिओ जबाब जारी करत म्हटले की, व्हॉट्सअप पेमेंट सर्व्हिस 10 प्रादेशिक भाषांच्या व्हॉट्सअप व्हर्जनमध्ये उपलब्ध असेल. झुकेरबर्ग म्हणाले की, व्हॉट्सअपच्या माध्यमातून पेमेंट केल्यास कोणत्याही प्रकारचा चार्ज वसूल केला जाणार नाही. व्हॉट्सअपचे भारतात 40 कोटींपेक्षा जास्त यूजर्स आहेत. कंपनी गेल्या 2 वर्षांपासून पेमेंट सर्व्हिस सुरू करण्याच्या मंजूरीची प्रतिक्षा करत होती. व्हॉट्सअप जवळपास 10 लाख यूजर्सच्या माध्यमातून पेमेंट सर्व्हिसची टेस्टिंग करत होते.
140 हून अधिक बँकांचे ग्राहक पैसे देण्यास सक्षम असतील
मार्क झुकेरबर्ग म्हणाले की, 140 हून अधिक बँकांचे ग्राहक व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून आपल्या मित्रांना आणि कुटुंबाला पैसे देण्यास सक्षम असतील. ते म्हणाले की व्हॉट्सअॅप पेमेंट पूर्णपणे सुरक्षित आहे. व्हॉट्सअॅपवरच्या माध्यमातून पेमेंट करण्यासाठी केवळ UPI सक्षम डेबिट कार्डची आवश्यकता असेल आणि आपण थेट पैसे देऊ शकाल. झुकेरबर्गच्या मते पेमेंट फीचर व्हॉट्सअॅपच्या नवीन अपडेटमध्ये उपलब्ध होऊ लागेल. व्हॉट्सअॅपने सांगितले की या सेवेसाठी ICICI बँक, HDFC बँक, अॅक्सिस बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) आणि जिओ पेमेंट्स बँक यांच्यासह भागीदारी झाली आहे.
2 कोटी यूजर्सने होईल सुरुवात
NPCI म्हटले आहे की व्हॉट्सअॅप 2 कोटी वापरकर्त्यांद्वारे पेमेंट सेवा सुरू करू शकेल. देशात UPI माध्यमातून पेमेंटमध्ये सातत्याने वाढ होत आहे. ऑक्टोबरमध्ये UPI देशात 2.07 बिलियन व्यवहार झाले आहेत. या माध्यमातून मागील महिन्यात म्हणजे सप्टेंबरमध्ये UPI 1.8 बिलियन व्यवहार झाले. देशात किरकोळ पेमेंट आणि सेटलमेंट सिस्टम चालवण्यासाठी 2008 मध्ये NPCI ची अम्ब्रेला संघटन म्हणून स्थापित करण्यात आले होते.
यूजर्सला हळुहळू मिळणार अपडेट
व्हॉट्सअॅपची पेमेंट सर्व्हिस हळूहळू आणली जात आहे. NPCI मार्गदर्शक तत्त्वांना ध्यानात घेऊन वापरकर्त्यांना हळूहळू पेमेंट सेवेचे अपडेट दिले जात आहेत. सुरुवातीला, सर्व वापरकर्त्यांना पेमेंट सर्व्हिसची अपडेट मिळणार नाही.