झूमकार होस्ट उपक्रमाने गाठला २०० कोटी उत्पन्नाचा टप्पा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. ०९ ऑगस्ट २०२२ । मुंबई । झूमकार या उदयोन्मुख बाजारपेठांमधील कार शेअरिंगसाठी आघाडीच्या बाजारस्थळाने आज घोषणा केली की, झूमकार होस्ट्सनी डिसेंबर २०२१ मध्ये होस्ट उपक्रम सुरू केल्यापासून २०० कोटी उत्पन्न कमावले आहे आणि आगामी १२ महिन्यांमध्ये हे उत्पन्न १,००० कोटींहून अधिकपर्यंत नेण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत.

झूमकारने या उपक्रमाच्या लाँचसह स्थिर वाढ केली आहे, तसेच व्यासपीठावर कार्स होस्ट करणा-या अधिकाधिक व्यक्ती अतिरिक्त उत्तम उत्पन्न कमावत आहेत. झूमकार ४० हून अधिक शहरांमध्ये १,००० हून अधिक अद्वितीय एसकेयू देते, ज्‍यामध्ये हॅचबॅक्स, सेदान्स, एमयूव्‍ही, एसयूव्ही, ईव्ही व लक्झरी कार्स या विभागांमधील कार्सच्या व्यापक पोर्टफोलिओसह विमानतळ व रेल्वे स्टेशन्स सारख्या परिवहन गंतव्यांचा समावेश आहे.

झूमकारमध्ये अधिक भर करत सरासरी होस्ट महिन्यातून १५ दिवस त्यांची वेईकल शेअर करतात आणि प्रतिमहिना जवळपास ५०,००० रूपये कमावतात. झूमकार होस्ट्समध्ये उद्योजक, कॉर्पोरेट कर्मचारी व लघु व्यवसाय मालकांचा समावेश आहे, जेथे जवळपास १५ टक्‍के होस्ट्सच्या झूमकार शेअरिंग बाजारस्थळावर सूचीबद्ध अनेक कार्स आहेत. होस्ट्सना त्यांचे स्वत:चे रेण्टल व्यवसाय निर्माण करण्यासाठी विद्यमान/नवीन वेईकल्समधून उत्पन्नाचा दुय्यम स्रोत निर्माण करण्यास प्रेरित केले जाते. झूमकार होस्ट्सची वयोमर्यादा मध्य-२० वर्षांपासून मध्य-५० वर्षांपर्यंत आहे.

झूमकारचे सह-संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रेग मोरन म्हणाले, “आम्हाला आमच्या होस्ट्ससाठी अधिक आर्थिक सक्षम वातावरण निर्माण करण्याप्रती आमच्या प्रवासामधील हा उत्साहवर्धक सुवर्ण टप्पा पार करण्याचा आनंद होत आहे. व्यासपीठ म्हणून आम्हाला आमच्या व्यासपीठाचा वापर करणा-या होस्ट्सच्या आकडेवारीमध्ये अपवादात्मक वाढ होताना दिसण्यात आली आहे आणि अधिकाधिक कार मालकांना झूमकारवर होस्टिंग करण्याचे आर्थिक लाभ समजत असल्यामुळे ही वाढ अधिक वाढण्याची अपेक्षा आहे. आमची टीम झूमकार व्यासपीठावरील आमचे होस्ट्स व अतिथींना उत्साहवर्धक ग्राहक अनुभव देण्यावर लक्ष केंद्रित करत आहे.”

झूमकार होस्ट वेब डिझाइनर एकता अग्रवाल म्हणाल्या, “मला झूमकारने संपादित केलेल्या सुवर्ण टप्‍प्‍याचा आनंद होत आहे. मी मागील ८ महिन्यांपासून व्यासपीठावर २ कार्ससह होस्ट राहिली आहे आणि माझ्या स्टॉक गुंतवणूकांपेक्षा अधिक कमावत आहे. या होस्ट उपक्रमाने आमच्यासाठी उत्पन्नाचा दुय्यम स्रोत निर्माण करण्यास मदत केली आहे, जेथे प्रत्येक कार आम्हाला प्रतिमहिना जवळपास ४० हजार रूपयांचे उत्पन्न देत आहे. झूमकारचे अभिनंदन, मी देखील दोन्‍ही कार्समधील माझ्या उत्पन्नाच्या २५ टक्‍के रक्‍कम गुंतवणूक करत आणखी एका कारची भर करण्याचे नियोजन करते. माझा रिफर केलेले माझे मित्र देखील होस्ट उपक्रमाचा वापर करताना खूप आनंदी आहेत.”


Back to top button
Don`t copy text!