झिंकच्या किंमती कमी होण्याची शक्यता: एंजेल ब्रोकिंग

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, मुंबई, दि. २३: एप्रिल २०२१ पासून बहुतांश बेस मेटलनी लंडन मेटल एक्सचेंजवर दुहेरी आकड्यात नफा कमावला आहे. झिंकने एमसीएक्स आणि एलएमईवर अनुक्रमे ९ टक्के आणि १० टक्के वाढ दर्शवली असली तरी येत्या महिन्याभरात झिंकचे एमसीएक्सवरील दर २१५ रुपये प्रति किलो नुसार घसरत्या दिशेने व्यापार करतील असा अंदाज एंजेल ब्रोकिंग लिमिटेडचे रिसर्च असोसिएट श्री. यश सावंत यांनी व्यक्त केला.

प्रदुषण रोखण्यासाठी चिनी अधिकाऱ्यांनी कडक पर्यावरणीय निर्बंध लादल्यामुळे त्यांच्या औद्योगिक क्षेत्राला मोठा झटका बसला. उच्च-ऊर्जा वापर करणाऱ्या उद्योगांमध्ये वाढत्या तुटवड्यामुळे गुंतवणूकदार सावध झाले. प्रामुख्याने झिंक आणि कॉपर उत्पादक देश, पेरू आणि चिली येथील खाण कंपन्यांवरील करात वाढ झाल्याने एप्रिलमध्ये झिंकच्या किंमती वाढल्या आहेत.

वाढत्या कमोडिटीजच्या किंमती स्थिर करण्याच्या दिशेने चीनची वाटचाल सुरु असल्याने औद्योगिक धातूंसाठी ही मोठी चिंतेची बाब आहे. कमोडिटीच्या किंमतीत होणारी अवास्तव वाढ रोखण्यासाठी चीनने वस्तूंच्या पुरवठ्यावरील व्यवस्थापन अधिक प्रबळ करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे जागतिक गुंतवणूकदारही पुढे जाण्यात सावधगिरी बाळगू शकतात. तसेच, चिनी अधिकाऱ्यांनी वीज वापरासंबंधी लावलेल्या कडक नियमांमुळे पुरवठ्यात अडथळे येतील तसेच सर्वाधिक धातू वापरणाऱ्या देशामधील मागणीवरही परिणाम होऊ शकतो. तसेच, पिपल्स बँक ऑफ चायना (पीबीओसी) त्यांचे आर्थिक धोरण आणखी कठोर करण्याची शक्यता असल्याने बेस मेटलच्या किंमतीवर आणखी परिणाम होऊ शकतो. यामुळे महिनाभरात झिंकचे एमसीएक्सवरील दर २१५ रुपये प्रति किलो नुसार घसरत्या दिशेने व्यापार करतील असा अंदाज श्री यश सावंत यांनी व्यक्त केला.


Back to top button
Don`t copy text!