दैनिक स्थैर्य । दि. ०९ जुलै २०२३ । मुंबई । धातूच्या क्षेत्रात अलीकडील काळात मोठ्या प्रमाणावर विक्री झाल्याची आणि त्यामुळे धातूच्या किमतींमध्ये मागील अनेक महिन्यांच्या तुलनेत खूप घट झाल्याची बाब लक्षात घेता झिंक हा धातू सर्वांत मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेल्या धातूंपैकी एक ठरला आहे. मागणीतील घट आणि एक्स्चेंजमधील साठ्यात झालेली अनपेक्षित वाढ तसेच चिनी दरांत घट, यूएस डॉलर मजबूती यामुळे स्टीलच्या गाल्वनायझेशनसाठी आवश्यक असलेल्या झिंकच्या किमतींनी २८ महिन्यांच्या तुलनेत तळ गाठला असल्याचे एंजल वन लिमिटेडचे संशोधन सहकारी, बेस मेटल्स श्री. साईश संदीप सावंत देसाई यांनी सांगितले.
घट घडवणारी कारणे: काही सकारात्मक बाबी असल्या तरी झिंकच्या किमतींमध्ये वाढ होण्यात अनेक बाबींचे अडथळे आहेत. दरांतील घट अंमलात आले तरीही त्यांनी गुंतवणूकदारांना निराश केले आहे, कारण ते सौम्य ठरले आणि अपेक्षा पूर्ण करू शकले नाहीत. या निराशेमुळे बाजारातील आत्मविश्वास कमी झाला आणि गुंतवणूकदारांना आणखी हस्तक्षेप करण्याची आवश्यकता जाणवू लागली. अपेक्षेपेक्षा कमी प्रमाणात दर कमी झाल्यामुळे गुंतवणूकदारांना आर्थिक वाढीला आणि धातूंच्या मागणीला चालना देण्यासाठी आणखी मोठ्या पाठबळाची गरज वाटू लागली आहे.
बाजारातील अति पुरवठा आणि वाढत्या इन्व्हेंटरीज: झिंकच्या किमतीवर प्रभाव टाकणारा आणखी एक घटक म्हणजे बाजारातील अति पुरवठा आणि वाढत्या इन्व्हेंटरीज होत. अलीकडील माहितीमधून दिसून येते की, झिंकच्या साठ्यात अनपेक्षित वाढ झाली आहे. त्यामुळे एकूणच लंडन मेटल एक्स्चेंज (एलएमई) साठ्यात आठ महिन्यांच्या तुलनेत वाढ झाली आहे. वाढता साठा म्हणजे मागणी कमी होणे आणि अतिरिक्त झिंक एलएमई गोदामांमध्ये पडून राहणे होय. तसेच, अमेरिकन डॉलर मजबूत झाल्यामुळे कमॉडिटीजवर नकारात्मक प्रभाव पडला आहे. त्यामुळे डॉलरच्या किमतीतील धातू इतर चलनांचा वापर करणाऱ्या ग्राहकांसाठी अधिक महागडे झाले आहेत.
याचा परिणाम म्हणून स्टील गाल्व्हनायझेशनमध्ये महत्त्वाचा धातू असलेल्या झिंकच्या किमती मागणी कमी आणि अतिरिक्त इन्व्हेंटरीमुळे कमी झाल्या आहेत. चीनमधील अपेक्षेपेक्षा कमी आर्थिक वाढ तसेच इतर प्रदेशांमध्ये वाढते व्याजदर आणि त्यामुळे वाढीवर प्रभाव यांच्यामुळे घसरण वेगाने होऊ लागली आहे. झिंकच्या किमतीत जानेवारीत प्रचंड वाढ झाल्यानंतर त्या जागतिक पुरवठ्यातील घटीमुळे ३० टक्क्यांपेक्षा जास्त वाढल्या आहेत. ३० मे २०२३ च्या एलएमई डेटानुसार झिंकच्या साठ्यात ८७५०० टनांची आठ महिन्यांतील सर्वाधिक वाढ झाली आहे. त्यातून झिंकच्या वापरावर अवलंबून असलेल्या बांधकाम उद्योगात विशेषतः मागणी कमी असल्याचे दिसून आले आहे. विविध प्रदेशांमध्ये बांधकाम उद्योगातील प्रचंड कामगिरीमुळे झिंकची मागणी आणखी कमी झाली आहे आणि चीनचा बांधकाम हंगाम अपेक्षेपेक्षा कमी वेगाने सुरू आहे. तसेच उन्हाळ्यात बांधकामाचा वेग मंदावतो. हेही एक कारण ठरले आहे.
यूएस डॉलर मजबूत होण्याचे परिणाम: यूएस कर्ज मर्यादा आणि दीर्घकालीन जास्त व्याजदराच्या अपेक्षा यांच्याबाबत चिंता व्यक्त केली जात असताना यूएस डॉलर मजबूत झाल्यामुळेही झिंकच्या किमती कमी होण्यावर परिणाम झाला आहे. याचा परिणाम म्हणून परदेशी चलनाचा वापर करणाऱ्या ग्राहकांना डॉलर्समधील साधनांसाठी जास्त पैसे भरण्याची गरज पडली आहे. अलीकडच्या काळातील घटनांमुळे डॉलर इंडेक्स १२ आठवड्यांचा सर्वोच्च झाला आहे. त्यामुळे धातूंच्या बाजारपेठेवर आणखी ताण आला आहे.
दृष्टीकोन: पायाभूत धातूंचे क्षेत्र अलीकडेच पुनरूज्जीवित झाले असून झिंकसारखे धातू सौम्य यूएस सीपीआय वाचनामुळे, चीनमधील दरांतील घट आणि मागणीच्या अपेक्षा आणि आटोक्यातील पुरवठा यांच्यामुळे झिंकसारख्या धातूंमध्ये सुधारणा झाली आहे. चीनच्या सेंट्रल बँकेने दहा महिन्यांत प्रथमच लघुकालीन कर्जदरांत घट केली आहे. त्यामुळे पायाभूत धातूंच्या बाजारपेठेवर मोठा प्रभाव पडला आहे. या उपाययोजना बाजारातील आत्मविश्वास पुनर्स्थापित करण्याचा प्रयत्न आणि चीनच्या अर्थव्यवस्थेत जागतिक साथीनंतर दुरूस्तीत मदत करतात.
हे घटक लक्षात घेऊन आगामी महिन्यात झिंकबाबतचा दृष्टीकोन सावधगिरीचा आणि आशावादाचा आहे. दरांमधील घट आणि चीनमधील संभाव्य चालना उपाययोजनांमुळे थोडी मदत मिळाली आहे परंतु बाजारपेठ अतिरिक्त धोरण कृतींशी संबंधित कोणत्याही घटनांबाबत संवेदनशील राहू शकते. पुरवठा आणि मागणीतील बाबींवर निरीक्षण, जागतिक आर्थिक परिस्थिती आणि गुंतवणूकदारांच्या संवेदनशीलता झिंकच्या किमतीतील पुढील दिशा निश्चित करण्यासाठी महत्त्वाच्या ठरतील. आम्हाला एमसीएक्स झिंक किमती प्रति किलो १९९ रूपयांपर्यंत कमी होतील अशी अपेक्षा आहे.