स्थैर्य, सातारा, दि. 17 : सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले यांनाही कोरोनाची बाधा झाली आहे. अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे समजताच ते उपचारासाठी कराड येथील कृष्णा चॅरिटेबल हॉस्पिटलमध्ये रात्रीच दाखल झाले.
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले यांच्या घरात एकाला आठ दिवसांपूर्वी कोरोनाची बाधा झाली होती. त्यांच्या दोन्ही मुलांपैकी एकाला सुरुवातीला लक्षणे जाणवली. त्यामुळे कबुले यांनी त्यावेळीच तपासणी केली होती. तेव्हा निगेटिव्ह आले होते. दुसर्या मुलाच्या तपासणीवेळी स्वॅब दिला होता. तेव्हाही निगेटिव्ह आले होते. पुन्हा त्यांना खोकला जाणवू लागल्याने जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांच्या विनंतीवरून स्वॅब तपासणी केली. त्याचा रिपोर्ट रात्री पॉझिटिव्ह आला. ते रात्रीच उपचारासाठी कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आहेत.
दरम्यान, जिल्हा परिषदेतील लिपिक पाटणमधून अप-डाऊन करत होता. त्याचाही अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे समजल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत यांनी दोन दिवस जिल्हा परिषदेचे कामकाज बंद ठेवण्याचा आदेश दिला गेला आहे. संबंधित लिपिकाच्या संपर्कात आलेल्या कर्मचार्यांचे स्वॅब घेण्यात आले. तसेच जिल्हा परिषदेच्या जिल्हा परिषदेच्या इमारतीचे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे.