जिल्हा परिषदा व पंचायत समित्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर


स्थैर्य, सातारा, दि. 10 ऑक्टोबर : महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, 1961 मधील तरतुदीनुसार व महाराष्ट्र जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या (जागांच्या आरक्षणाची पध्दत व चक्रानुक्रम) नियम, 2025 नुसार जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्रात सभा घेऊन अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व त्यामधील स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागा आणि सर्वसाधारण स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागा निश्चित करावयाच्या आहेत. त्याकरिता सोडत पध्दतीने कार्यवाही करण्याकरिता खाली दर्शविल्याप्रमाणे जिल्हा परिषदेचे नाव, सभेचे ठिकाण व सभेची वेळ व तारीख याप्रमाणे विशेष सभा आयोजित करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिली.

सातारा- जिल्हा परिषद– नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा स. 11.30 वा दि. 13/10/2025 2) खंडाळा पंचायत समिती-तहसिल कार्यालय, खंडाळा स. 11.30 वा. दि.13/10/2025 3) फलटण पंचायत समिती-सजाई गार्डन मंगल कार्यालय, जाधववाडी (फ) स. 11.30 वा दि.13/10/2025 माण पंचायत समिती-तहसिल कार्यालय, दहिवडी सभागृह स. 11.30 वा. दि.13/10/2025  खटाव पंचायत समिती –पंचायत समिती सभागृह, खटाव स. 11.30 वा. दि.13/10/2025 कोरेगाव पंचायत समिती- तहसिल कार्यालय, कोरेगांव स. 11.30 वा. दि.13/10/2025 वाई पंचायत समिती- देशभक्त किसनवीर सभागृह, पंचायत समिती, वाई स. 11.30 वा. दि.13/10/2025 महाबळेश्वर पंचायत समिती – मध संचालनालय, महाबळेश्वर स. 11.30 वा दि.13/10/2025 जावली पंचायत समिती- पंचायत समिती सभागृह, मेढा स. 11.30 वा दि.13/10/2025 10) सातारा पंचायत समिती- स्व. आ. श्रीमंत छत्रपती अभयसिंहराजे भोसले सभागृह, पंचायत समिती, सातारा स. 11.30 वा दि.13/10/2025 पाटण पंचायत समिती-लोकनेते बाळासाहेब देसाई, कृषी संकूल, तालुका कृषी अधिकारी कार्यालय, कराड-चिपळूण रोड, काळोली स. 11.30 वा. दि.13/10/2025 कराड पंचायत समिती-स्व. यशवंतराव चव्हाण सभागृह (टाऊन हॉल), कराड स. 11.30 वा दि.13/10/2025 जिल्हा परिषद अथवा पंचायत समितीतील ज्या रहिवाशांची सदर सभेस हजर राहण्याची इच्छा आहे, त्यांनी वरील ठिकाणी व वेळी हजर राहावे असे आवाहन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!