
दैनिक स्थैर्य | दि. १५ फेब्रुवारी २०२५ | फलटण | आगामी होवु घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या राजे गट पूर्वीप्रमाणेच संघटना अथवा स्थानिक आघाडी म्हणूनच लढणार असल्याची माहिती माजी आमदार दिपक चव्हाण यांनी दिली.

फलटण येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाबाबत छेडले असता त्यांनी राजे गटाची भूमिका स्पष्ट केली.
फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार सचिन पाटील हे जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप केला. यावेळी फलटण शहरात व तालुक्यात सुरू असलेली विविध विकासकामे ही श्रीमंत रामराजे, श्रीमंत संजीवराजे यांच्या माध्यमातून आम्ही प्रस्तावित केलेली होती. त्याचे श्रेय आमदार सचिन पाटील हे घेत असल्याचा घणाघाती आरोप सुद्धा यावेळी माजी आमदार दिपक चव्हाण यांनी केला आहे.