झी ने ‘हिपी’ या शॉर्ट व्हिडिओ अॅपसोबत मनोरंजनाचे भविष्य साकारले

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, मुंबई, दि. २०: डिजिटल कंटेंटचा वापर लोकांमध्ये अधिकाधिक लोकप्रिय होत असताना, हिपी (HiPi) या भारतातील वेगाने वृद्धिंगत होणाऱ्या शॉर्ट व्हिडिओ प्लॅटफॉर्मने यूझर-जनरेटेड कंटेंट मार्केटमध्ये स्वतंत्र अॅपची घोषणा केली. झी५ चा एक भाग म्हणून २०२० मध्ये लाँच झालेले बीटा व्हर्जन, ‘हाय-पाय का नया अड्‌डा’ आता १८ जूनपासून अँड्रॉइड यूझर्ससाठी आणि २२ जून २०२१ पासून आयओएस यूझर्ससाठी उपलब्ध आहे. या अॅपमध्ये दर्जेदार सुविधा असून यात नव्या ट्रेंडिंग म्युझिक ट्रॅक, तसेच प्रेक्षकांसोबत दृढ नाते निर्माण करण्यासाठी इंटरॅक्टिव्ह फिल्टर्स आणि इफेक्टचा समावेश आहे. तसेच अॅपवर यूझर्सना थ्रीडी फेस फिल्टर्स, लिप-सिंक, एडिट व्हिडिओ आणि त्यांच्या कंटेंटमध्ये अधिक जादू आणण्यासाठी व्हिडिओ डबिंगची सुविधाही देण्यात आली.

या नव्या प्रवासाचा भाग म्हणून, हिपीने गंमतीची व्याख्या नव्याने परिभाषित करण्यासाठी महिनाभर चालणारे ‘एंटरटेनमेंटकीबारिश’ मोहीम राबवली. देशभरातील क्रिएटर्स आणि प्रेक्षकांना एक ब्रेक देत डिजिटल कंटेंट क्षेत्रात लोकशाहीकरण आणण्याचे उद्दिष्ट यामागे आहे. या कँपेनमध्ये नामांकित ब्रँडसोबत करार केला जाईल. तसेच यूझर्सना डान्स बांगला डान्स यासारख्या अप्रतिम विविध शैली आणि स्पर्धांमध्ये सहभागी होता येईल. यात क्रिएटर्स आणि प्रेक्षकांना साप्ताहिक डान्स थीमनुसार, एक युनिक टूक स्टेप सादर करून साप्ताहिक बक्षीस जिंकू शकतात.डान्स बांगला डान्सचे परीक्षक आणि मार्गदर्शकांद्वारे त्यांची निवड केली जाईल.

२२ आठवड्यांची ही स्पर्धा निर्माता आणि प्रेक्षक अशा दोन भागात विभागली जाईल. निर्मात्यांच्या स्पर्धेत २० डान्स बांगला डान्स स्पर्धकांचा समावेश असेल. रिअॅलिटी शोमध्ये सहभागी होतानाच ते हिपीवर त्यांचे व्हिडिओ पोस्ट करतील. डान्स बांगला डान्स स्पर्धकांपैकी एकाला ग्रँड विनर घोषित केले जाईल. त्यांना २ लाख रुपयांचे रोख बक्षीस आणि हिपीबरोबर ३ महिन्यांच्या कराराची संधी मिळेल. दरम्यान, प्रेक्षकांच्या स्पर्धेत हिपी यूजीसीच्या प्रवेशिकांमधून स्पर्धेच्या कालावधीत २ लाखांपर्यंतची बक्षीसे जिंकण्याची संधी मिळवणारे सहभागी निवडले जातील. हिपीवरील लोकप्रियतेच्या आधारे दोन्ही प्रकारातील विजेत्यांची निवड केली जाईल.

हिपीचे प्रवक्ते म्हणाले की, “भारतीय बाजारात लाँच झाल्यानंतर आमच्या अद्वितीय अॅपची कामगिरी सादर करणे ही खूप मोठी कामगिरी आहे. आमच्या यूझर्सकडून मिळालेल्या जबरदस्त प्रतिसाद आणि पाठींब्याचा हा परिणाम आहे. आम्ही एंटरटेनमेंटकीबारिश’ मार्फत याची परतफेड करू इच्छितो. या मोहिमेत उत्साहपूर्ण कार्यक्रम आणि स्पर्धा घेण्याचे आम्ही वचन देतो. तसेच यूझर्सना त्यांच्या बोटांमार्फत मनोरंजन मिळवण्याचीही सुविधा प्राप्त करून देतो.”

मजा आणि मनोरंजनयुक्त मोहिमेसोबतच, हिपी एक स्पर्धाही घेणार आहे. यामार्फत यूझर्सना त्यांची उत्कृष्ट प्रतिभा (डान्स, गाणे, लिप-सिंक, पदार्थ, फिटनेस, फॅशन, सौंदर्य इत्यादी) दर्शवणारे व्हिडिओ अपलोड करण्याची परवानगी मिळेल. स्पर्धेतील विजेत्यांना ५०,००० रुपयांचे रोख बक्षीस दिले जाईल.


Back to top button
Don`t copy text!