
दैनिक स्थैर्य । दि. ३१ ऑक्टोबर २०२२ । बारामती । झैनबिया इंग्लिश मीडियम स्कूल कटफळ व बारामतीच्या वतीने सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त व राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त “एकता दौड” रॅलीचे आयोजन सोमवार 31 ऑक्टोम्बर रोजी करण्यात आले होते.
बारामती बँकेचे चेअरमन सचिन सातव यांच्या शुभहस्ते कारभारी सर्कल चौक येथून रॅलीस प्रारंभ करण्यात आला. बारामतीतील कारभारी सर्कल ते झैनबिया स्कूल बारामती पर्यंत करण्यात आली होती. या रॅलीमध्ये विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी, पालक, क्रीडा प्रेमी आदींनी सहभाग घेतला. या प्रसंगी पारवडी केंद्राचे केंद्रप्रमुख श्री.विश्वास बागडे आणि डॉ. आनंद हरके व शाळेच्या मुख्याध्यापिका इन्सिया नाशिकवाला आदी मान्यवर उपस्तित होते.